Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNE

झोपडपट्टी अधिकार परिषदेचे रविवारी आयोजन

पुणे :  झोपडपट्टी धारकांची एस आर ए च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या संदर्भात व्यापक विचार विनिमय करण्यासाठी झोपडपट्टी अधिकार  परिषदेचे आयोजन रविवारी (8 जून) करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकार भवन , गांजवे चौक , नवी पेठ पुणे. येथे सकाळी 10.30 वा. आयोजित या परिषदेत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. असिम सरोदे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, एस.आर.ए. संघर्स समितीचे देवीदास ओव्हाळ, जावेद शेख यांच्यासह मान्यवर सहभागी होणार असल्याचे डंबाळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply