Sunday, June 14, 2026
ENTERTAINMENTLatest News

मर्दानी छातीचा, तांबड्या मातीचा, रांगड्या ह्रिषीकेश युवराज चव्हाण आणि श्रुती राऊळ यांनी पटकावली ‘चल भावा सिटीत’ ची ट्रॉफी आणि १० लाख बक्षीस

झी मराठी वर काही महिन्यापूर्वी एक चल भावा सिटीत’ रिऍलिटी शो सुरु झाला आणि काही भागांमध्ये प्रेक्षकांचा लाडका शो बनला. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय म्हणत कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा एक असा शो होता ज्यांनी रियालिटी शोची परिभाषा बदलली. ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमी असलेल्या स्पर्धकांना एकत्र आणणार शो लोकांना खूप काही शिकवून ही गेला. स्पर्धकांना अश्या आव्हानांना सामोरे जावे लागलं जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त केलं. ग्रामीण आणि शहरी भागातल्या स्पर्धकांनी एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतला आणि अनेक आव्हान साध्य केली. ‘चल भाव सिटीत’ च्या पहिल्या सीजनचा विजेत्याचा प्रवास ही सोपा न्हवता.

मर्दानी छातीचा, तांबड्या मातीचा, मजबूत बांध्याचा रांगडा गडी ह्रिषीकेश युवराज चव्हाण , यांकोबा तालमीच्या मैदानात तयार झालेला अस्सल पेहलवान. एकमेकांसोबत जुळवून घेत हृषीकेश-श्रुती ने शोची एक-एक पायरी पादाक्रांत केली. श्रुतीच्या खंबीर पाठिंब्याने हृषीकेश अनेक कठीण टास्कला सामोरा गेला. टप्प्या-टप्प्यावर श्रुतींने वाढवलेलं मनोबल आणि त्याची जिंकण्याची उर्मी यामुळे तो ‘चल भावा सिटीत’ चा जबरदस्त परफॉर्मर तर बनला आणि शोची विनर ट्रॉफी आणि रु १०,००,०००/- जिंकून आपलं नाव चर्चेत ठेवलं.

‘चल भावा सिटीत’ चा महाअंतिम सोहळा गाजला तो अनेक मनोरंजक परफॉर्मेन्ससने – देवमाणसाने म्हणजेच किरण गायकवाड ने आपल्या अनोख्या अंदाजात आपली ओळख दाखवली. तर झी५ ची मराठी वेब सिरीज ‘अंधार माया’ ची टीम पोहचली स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढवायला. प्रेक्षकांची लाडकी लीला म्हणजेच वल्लरी विराज च्या परफॉर्मेंसने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणला. ‘चल भावा सिटीत’ ह्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading