Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

८ जून रोजी ‘दीपक’ कार्यक्रमाचे आयोजन

 

पुणे : सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या कथक नाद या संस्थेच्या वतीने येत्या रविवार दि. ८ जून रोजी मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात सायं ५ वाजल्यापासून ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना शीतल कोलवालकर म्हणाल्या, “माझ्या आजवरच्या नृत्याच्या प्रवासात माझे वडील दीपक कोलवालकर यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी कायमच मला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली तीन वर्षे आम्ही ‘दीपक’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. या कार्यक्रमाद्वारे नवोदित व आश्वासक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत उपस्थितांना दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अनुभविता यावे हा आमचा उद्देश आहे.”

यावर्षी दीपक या कार्यक्रमाची सुरुवात नवोदित व आश्वासक नर्तिका अन्वी श्री यांच्या कथक सादरीकरणाने होईल. यावेळी वेदांत जोशी (तबला), अमेय बिच्चु (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन) आणि मुक्ती श्री (पढंत) हे साथसंगत करतील. यानंतर पं हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य असलेले पं रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन रंगेल. कुलकर्णी यांना यशवंत वैष्णव हे तबलासाथ करतील. कार्यक्रमाचा समारोप जयपूर अत्रौली घराण्याचे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने होईल. यावेळी त्यांना ऋषिकेश जगताप (तबला) व अमेय बिच्चु (संवादिनी) हे साथसांगत करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading