आबासाहेब काळे युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार
पुणे : हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार, छत्रपती पुरस्कार, कुमार महाराष्ट्र केसरी व मुंबई महापौर केसरी पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या उपस्थितीत आबासाहेब काळे युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी पुरस्कार्थींच्या वार्षिक मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विविध पुरस्कारप्राप्त खेळाडू उपस्थित होते.
