युपीएससी २०२४ मध्ये दीपस्तंभ ‘मनोबल’च्या १८ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; यामध्ये ७ दिव्यांगांचा समावेश!
फाऊंडेशनचा मनू गर्ग प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये भारतात प्रथम!
आज यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग (AIR91), रवी राज (AIR182), प्रणव कुलकर्णी (AIR 256), पुष्पराज खोत (AIR304), श्रीरंग काओरे (AIR396), बिरदेव डोणे (AIR551), रोहन पिंगळे (AIR581), वेदान्त पाटील (AIR601), ओंकार खुंटाळे (AIR673), अभिजीत अहेर (AIR734), श्रीतेश पटेल (AIR746), तुषार मेंदापारा (AIR), हर्षिता मेहनोत (AIR766), संपदा वांगे(AIR839), मोहन (AIR984), मयंक भारद्वाज (AIR985), संकेत शिंगाटे (AIR479), दिलीप कुमार देसाई (AIR605) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना आनंद पाटील (IAS), वैभव निंबाळकर (IPS), सागर डोईफोडे(IAS), धिरज मोरे(IRS), पूजा कदम (IRS), मिलिंद पाटील (विभागप्रमुख, दीपस्तंभ) यांच्याबरोबर ४० अधिकाऱ्यांच्या टीमने मार्गदर्शन केले आहे अशी माहिती मनोबलचे प्राध्यापक अमोल लंके यांनी दिली.
यावेळी बोलताना दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन सर यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिद्द आणि चिकाटी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशामुळे संपूर्ण समाजाला नवी दिशा मिळेल. मनोबल प्रकल्पाचा खरा उद्देशच अशा क्षणांना आकार देणं हाच आहे.”
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी मनू गर्ग (AIR 91) यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मी २०२१ पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेलो आहे. दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध असलेले अॅक्सेसेबल स्टडी मटेरियल, वैयक्तिक मार्गदर्शन, आणि सतत प्रेरणा देणारे अभ्यासपूरक वातावरण—यामुळे युपीएससी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. माझ्या या यशाच्या प्रवासात दीपस्तंभ मनोबलने दिलेल्या अमूल्य योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो.”
