खासदार उदयनराजे भोसले यांची ईश्वरपुरम् संस्थेस भेट
पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच फुलगांव येथील ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह असलेल्या ‘ईश्वरपुरम्’ संस्थेला भेट देत नागालैंड आणि अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या बलिदान दिनानिमित्त (मृत्युंजय अमावास्या) श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करीत शंभूभक्तांच्या मूकयात्रेला प्रारंभ केला. तुळापूर येथून श्रीक्षेत्र वडू येथील समाधिस्थळी जात असताना वाटेत त्यांनी ‘ईश्वरपुरम्’ संस्थेला भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी त्यांचे स्वागत केले तर कार्यवाह बाळासाहेब चांदेरे यांनी त्यांचा सत्कार केला. संस्थेचे कोषाध्यक्ष प्रशांत जोशी, विश्वस्त संदीप पूरकर, नवनाथ वागसकर तसेच व्यवस्थापिका शुभांगी व अमित मेहता याप्रसंगी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली व संस्थेच्या परिसराची पाहणी देखील केली.
