शॅम्पू हेअर कलरसाठी महाराष्ट्र महत्त्वाची बाजारपेठ
महाराष्ट्रात शॅम्पू हेअर कलर या उत्पादनास मोठी मागणी आहे. केसांना रंग लावण्याचा हा पर्याय सोयीस्कर आणि जलद असल्यामुळे ग्राहकांमध्ये शॅम्पू हेअर कलर वापरण्याचा कल वाढू लागला आहे. व्यावसायिक कर्तनकाराच्या मदतीशिवाय सहज वापरता येत असल्याने, शॅम्पू हेअर कलरच्या ‘डू-इट-युअरसेल्फ’ (डीआयवाय) स्वरुपाच्या पर्यायाकडे राज्यातील ग्राहक अधिक प्रमाणात वळत आहेत.
हा शॅम्पू कलर सहजपणे वापरण्याच्या सोयीविषयीची जागरुकता आणि त्यास असलेली मागणी यामुळे भारतात या कलरची बाजारपेठ ९०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ११० कोटींहून अधिकचा आहे. उद्योग क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते शॅम्पू आधारित हेअर कलरचे सोयीस्कर आणि जलद परिणाम देणारे स्वरूप हे या मागणीच्या वाढीमागचे मुख्य कारण आहे. पारंपरिक हेअर कलर आणि पावडर किंवा मेहंदी यांसारख्या इतर पर्यायांच्या तुलनेत हा प्रकार अधिक प्रभावी आणि आधुनिक जीवनशैलीसाठी अनुकूल ठरत आहे.
“ग्राहक वैयक्तिक आणि नाविन्यपूर्ण हेअर कलर सोल्यूशन्स शोधत असतात. त्यामुळेच शॅम्पू हेअर कलरची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे,” असे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे (जीसीपीएल) वैयक्तिक निगा विभागाचे मार्केटिंग प्रमुख नीरज सेंगुत्तुवन यांनी सांगितले. या बदलत्या कलांची दखल घेत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने ‘गोदरेज सेल्फी’ हा पाच मिनिटांत केसांना रंग देणारा शॅम्पू हेअर कलर सादर केला आहे. हे युनिसेक्स उत्पादन दोन वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये उपलब्ध आहे १५ रुपयांचा पॅक छोट्या केसांसाठी आणि ३० रुपयांचा पॅक लांब केसांसाठी उपयुक्त आहे.
“कमी किमतीची पावडर किंवा मेहंदी हेअर कलर वापरणाऱ्या ग्राहकांना आमचा हा पर्याय अधिक सोयीस्कर, परवडणारा आणि चांगल्या उपायाकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे,” असे सेंगुत्तुवन पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील शॅम्पू हेअर कलर उत्पादनाची मागणी १७ टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढत असून, राज्यात या सोयीस्कर हेअर कलरिंग फॉरमॅटचा स्वीकार वेगाने वाढत आहे. या उत्पादनांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने, हेअर कलर बाजारपेठेच्या वाढीत येत्या काही वर्षांत एकूण भारताच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे.
