Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह बनले दारूचा अड्डा

 

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्या विद्यार्थिनींवर आणि हा सर्व प्रकार दडपणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

विद्यापीठातील वसतिगृहातील विद्यार्थिनी दारू व सिगारेट ओढतात तरीही विद्यापीठकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. ही आश्चर्यकारक बाब आहे. संबंधित विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीमध्ये तिच्या रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी तिला बळजबरीने दारू पाजत असल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थिनीला असभ्य वागणूक देऊन तिला शिव्या दिल्या आहेत. विद्यापीठाला दिलेल्या तक्रारीमध्ये या सर्व बाबी नमूद केल्या आहेत. संबंधित विद्यार्थिनी गेल्या काही महिन्यांपासून हा सर्व त्रास सहन करत आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात नाही. याउलट ज्या दिवशी संबंधित विद्यार्थिनीच्या तक्रारीवर चौकशी समितीची सुनावणी घेतली जाणार होती; त्याच दिवशी माजी महिला वसतिगृह प्रमुख यांना हटवले जाते. हा केवळ योगायोग होता की आणखी काही होते, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading