Friday, May 15, 2026
BusinessLatest News

तनिष्कच्या नवीन गोल्ड एक्सचेंज ऑफरमध्ये मिळवा जास्तीत जास्त मूल्य

 

पुणे :  सोन्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत, असे असताना देखील ग्राहकांना त्यांच्या जुन्या सोन्याचे सर्वात जास्त मूल्य मिळवण्याची अनोखी संधी उपलब्ध करवून देत आहे टाटा परिवारातील एक सदस्य आणि भारतातील सर्वात मोठा ज्वेलरी रिटेल ब्रँड – तनिष्क. प्रस्तुत आहे ‘तनिष्क गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम’. वर्षानुवर्षे लॉकरमध्ये ठेवलेले, विस्मरणात गेलेले छोटे-छोटे दागिने असोत किंवा कुटुंबाचा वारसा मानले गेलेले दागिने असोत, तनिष्कमध्ये प्रत्येकाचे स्वागत आहे. तुमचे जुने दागिने कितीही छोटे असोत किंवा मोठे, तनिष्कमध्ये त्यांना एक्स्चेंज करून तुम्ही मिळवू शकाल असे दागिने जे आजच्या काळातील आवडनिवड व महत्त्वाकांक्षा दर्शवतात. तनिष्कचा गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम हा तनिष्क एक्स्चेंज अड्वांटेज वर आधारित आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळतात १००% पारदर्शकता, शून्य वजावट आणि सोन्याचा उपलब्ध असलेला सर्वोत्तम दर मिळतो. 

ही ऑफर अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे जे दागिन्यांना फक्त दागिने नाही तर आपली स्टाईल आणि यशाची सोनेरी अभिव्यक्ती मानतात जी आयुष्यभर सोबत ठेवता येते. लग्नासाठी दागिने खरेदीचा विचार करत आहात तर घरामध्ये गेली कित्येक वर्षे पडून असलेले सोने तनिष्कमध्ये एक्स्चेंज करून तुम्ही मिळवू शकाल तनिष्कच्या अनोख्या कारीगरीने घडवण्यात आलेली अतिशय मनमोहक वेडिंग डिझाइन्स. इतकेच नव्हे तर, तुम्ही जुने सोने एक्स्चेंज करून नैसर्गिक हिरे देखील मिळवू शकाल, जे तुमच्या कलेक्शनला मिळवून देतील दुर्मिळ व कालातीत चमक. शुद्ध सोन्यासाठी २२ कॅरेट आणि त्यापेक्षा जास्तीच्या तसेच स्टडेड दागिन्यांसाठी २१ कॅरेट व त्यापेक्षा जास्तीच्या सोन्यावर काहीही वजावट केली जाणार नाही. तनिष्कमध्ये ग्राहकांना मिळतात सहजसोप्या व ईमानदार प्रक्रियेचे लाभ. प्रक्रिया अचूक व्हावी यासाठी ग्राहकांच्या समोरच कॅरेटमीटर परीक्षण करून सोने विरघळवले जाते.

तनिष्क गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम, सर्व तनिष्क स्टोर्समध्ये चालवला जात आहे. ही ऑफर अगदी योग्यवेळी आली आहे, लग्नसराई आणि सणांची रेलचेल असल्यामुळे घराघरात सोने खरेदीची चर्चा सुरु आहे. कुटुंबाचा वारसा शानदार वेडिंग ज्वेलरीमध्ये परिवर्तित करण्याची इच्छा असलेली आधुनिक नवरी असो किंवा सर्वात चांगले मूल्य मिळावे असे वाटणारा स्मार्ट गुंतवणूकदार असो, आधुनिक डिझाईनच्या बाबतीत चोखंदळ ट्रेंड्सविषयी जागरूक ग्राहक असो किंवा कालातीत सौंदर्याचा शोध घेणारा कारिगरीचा पारखी असो, तनिष्कमध्ये प्रत्येकाच्या मागण्या, इच्छा, गरजा पूर्ण होतात. तुम्ही तुमचे सर्वात नाजूक किंवा जुने दागिने एक्स्चेंज करून मिळवू शकता सुंदर आधुनिक दागिने. तनिष्कचा हा उपक्रम सिद्ध करतो की, सोन्याचे दागिने कितीही लहान असोत त्यांचे मूल्य कधीही लहान नसते. विश्वास आणि कारीगरीचा वारसा पुढे चालवत, तनिष्कने याआधीच १ लाखांहून जास्त नववधुंना त्यांच्या स्वप्नातील वेडिंग ज्वेलरी बनवण्यात मदत केली आहे आणि देशभरामध्ये १७०००० किलोग्रॅम जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. फेस्टिवल ऑफ एक्स्चेंजचा एक भाग म्हणून चालवला जाणारा हा उपक्रम म्हणजे निव्वळ एक ऑफर नव्हे तर, ग्राहकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दागिन्यांना नवीन रूप देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठीचे आमंत्रण आहे. हीच योग्य वेळ आहे तुमच्या सोन्याच्या वास्तविक क्षमता अनलॉक करण्याची, दागिने कितीही छोटे आणि जुने असू द्या, तनिष्कच्या ऑफरचा लाभ घ्या आणि दागिन्यांना नवसंजीवनी मिळवून द्या.

टायटन कंपनी लिमिटेडचे तनिष्कचे रिटेल आणि मार्केटिंग उपाध्यक्ष श्री अरुण नारायण यांनी सांगितले, “आजच्या काळात सोन्याच्या किमती उच्चांक गाठत असताना लग्नाचे बजेटिंग खूपच काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. तनिष्कचा गोल्ड एक्स्चेंज प्रोग्राम संपूर्ण भारतभरातील कुटुंबांसाठी आनंदाची सोनेरी किरण आहे. १ लाखांहून जास्त नववधुंनी आपले जुने सोने तनिष्कमध्ये एक्स्चेंज करून आपल्या लग्नामध्ये तनिष्क वेडिंग ट्रूसो परिधान करण्याचे स्वप्न अगदी सहज पूर्ण केले आहे. प्रत्येक तनिष्क ब्युटिकमध्ये कुशल कारीगर, प्रगत उपकरणे आणि पारदर्शक शुद्धता परीक्षण व सोने विरघळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळेच इथे मिळते तुमच्या जुन्या सोन्याचे सर्वोत्तम मूल्य. ते एक्स्चेंज करा आणि मिळवा अशी शानदार वेडिंग ज्वेलरी जिचे स्वप्न तुम्ही नेहमीच पाहत असता. आपल्या इच्छेप्रमाणे लग्न करायचे असेल तर जुने सोने एक्स्चेंज करून मिळवा तनिष्कचे नवीन, अतिशय सुंदर दागिने. देशभरातील आमच्या ५०० पेक्षा जास्त स्टोर्सपैकी कोणत्याही स्टोरमध्ये तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading