Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

ध्वनी अकादमीच्या वतीने पेहेल कार्यक्रमाचे २३ मार्च रोजी आयोजन

 

पुणे : ध्वनी अकादमीच्या वतीने येत्या रविवार दि. २३ मार्च रोजी पेहेल या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील सेवा भवन सभागृहात सायं ६ वाजता सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसार आणि प्रचारासाठी कार्यरत असलेल्या ध्वनी अकादमीच्या वतीने आयोजित पेहेल या कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक भालेराव यांच्या एकल तबलावादनाने होईल. कार्तिक भालेराव हे पं अनिरुद्ध देशपांडे यांचे शिष्य आहेत. कार्तिक यांना सुधीर टेकाळे हे संवादिनीवर साथसंगत करतील.

यानंतर बी एस मठ यांच्या शिष्या वीणा मठ यांचे व्हायोलिनवादन संपन्न होईल. वीणा यांना मल्लेश हुगर हे तबल्यावर साथसंगत करतील. पं. अजॉय चक्रबर्ती यांचे शिष्य व गायक अमोल निसळ यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. निसळ यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध तबलावादक अभिजित भट्टाचार्य हे तबलासाथ करतील तर सुधीर टेकाळे हे संवादिनीसाथ करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading