Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र सरकारतर्फे पुण्यातील ‘सोफोश’ संस्था ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ ने सन्मानित

पुणे : अनाथ आणि निराधार मुलांचे संरक्षण, पुनर्वसन आणि दत्तक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे सक्रिय असलेल्या पुण्यातील ‘सोफोश’ या संस्थेला नुकताच महाराष्ट्र सरकारतर्फे ‘सर्वोत्कृष्ट विशेष दत्तक संस्था’ या श्रेणीत प्रतिष्ठित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे यशवंत चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केल्या गेलेल्या पुरस्कार सोहोळ्यामधे हा पुरस्कार प्रदान आला.

या पुरस्कार सोहोळ्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री – आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आयोगाच्या अध्यक्षा – सुशीबेन शाह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘सोफोश’ संस्थेचे अध्यक्ष, सी.ए. सचिन अभ्यंकर यांनी हा पुरस्कार संस्थेतर्फे स्वीकारला.

या कार्यक्रमामध्ये बाल संरक्षणात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अधिकारी आणि संघटनांचा देखील गौरव करण्यात आला.

Leave a Reply