Thursday, October 29, 2026
BusinessLatest NewsSports

युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी डाबर ग्लुकोजने ‘एनर्जाइज इंडिया कॅम्पेन’ लाँच केले

पुणे: डाबरचे इन्स्टंट एनर्जी ड्रिंक असलेल्या डाबर ग्लुकोजने देशभरातील क्रीडा अकादमींमध्ये तरुणांमधील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंमध्ये ऊर्जा आणि तग धरण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एनर्जाइज इंडिया’ ही मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत, डाबर ग्लुकोजने लक्ष्मणभाऊ जगताप क्रिकेट अकादमीमध्ये ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता व्यवस्थापनावर एक विशेष जागरूकता सत्र आयोजित केले. यावेळी क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. मनोज मुळे, फुटबॉल प्रशिक्षक श्री. दिनेश दास, डाबर इंडियाचे श्री. दिनेश कुमार हे देखील उपस्थित होते. सत्रादरम्यान, खेळाडूंना खेळादरम्यान त्यांची कामगिरी कशी सुधारता येईल आणि त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर कसा करता येईल हे सांगण्यात आले. डाबरने अकादमीतील अव्वल खेळाडू अर्णव, सार्थक आणि वेद यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

 “युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा आणि तग धरण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एनर्जाइज इंडिया’ मोहीम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही मोहीम त्यांना त्यांच्या खेळात उर्जेसह सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रेरित करेल. डाबर हा खेळाडू, क्रीडा चाहते आणि सक्रिय जीवनशैली जगू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक परिपूर्ण ब्रँड आहे. डाबर ग्लुकोज त्वरित ऊर्जा प्रदान करते, म्हणूनच ते विशेषतः शारीरिक हालचाली करणाऱ्या खेळाडूंसाठी चांगले आहे. डाबर इंडिया लिमिटेडच्या हेल्थ सप्लिमेंट्सचे मार्केटिंग प्रमुख श्री. अमित गर्ग म्हणाले.

लक्ष्मणभाऊ जगताप क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक श्री. मनोज मुळे यांनी ऊर्जा सत्रादरम्यान तरुण खेळाडूंना सांगितले की, खेळात चांगल्या कामगिरीसाठी पोषण आणि हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. या सत्रादरम्यान त्यांना सांगण्यात आले की ते त्यांचा स्टॅमिना आणि सहनशक्ती कशी वाढवू शकतात, जे खेळाडूसाठी खूप महत्वाचे आहे.

श्री अमित गर्ग पुढे म्हणाले, ‘डाबर ग्लुकोजने नेहमीच तरुणांना निरोगी आणि सक्रिय जीवनशैली जगण्यास प्रेरित केले आहे. तरुण खेळाडूंसोबतची ही भागीदारी या ध्येयाकडे आणखी एक पाऊल आहे. त्याच्या ताज्या चवी आणि त्वरित उर्जेसह, डाबर ग्लुकोज हा तरुण खेळाडूंसाठी त्यांची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन देण्यासाठी एक आदर्श पर्याय आहे.

Leave a Reply