विधानपरिषेदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देणार सुभाष जगताप यांना संधी
— महापालिका निवडणूका पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रश्नांची सखोल माहिती आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सुभाष जगताप यांना मिळणार संधी-
पुणे : पुणे शहरातून विधानसभेवर राष्ट्रवादी पक्ष संधी देणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे .पुणे महापालिका निवडणूका समोर आल्या असल्याने पुण्याला सर्वच पक्ष झुकते माप देणार असल्याचे बोलले जात आहे .राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सहा वेळा नगरसेवक,स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेतेपदी अतिशय यशस्वी रित्या काम केलेले सुभाष जगताप यांना संधी देणार असल्याची चर्चा चालू आहे .
पुणे शहरातल्या विविध प्रश्नाची जाण,अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व तसेच पुणे महापालिकेच्या विविध कामाचा आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने जगताप याना संधी दिली जाऊ शकते .त्यातच पुणे शहरात झोपडपट्टया आणि त्यातील एकगठ्ठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागासवर्गीय एकही चेहरा सध्या राष्ट्रवादीकडे नाही .त्यामुळे सुभाष जगताप यांच्या नावाला अजित पवार आणि वरिष्ठ पक्ष नेतृत्व खरच संधी देणार का हे लवकरच स्पष्ट होईल .
