Monday, June 15, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

त्यामुळे राहुल गांधी हा भारतीय जनता पक्षासाठी हुकमी एक्का – शहजाद पूनावाला

नवी दिल्ली:  राहुल गांधी यांनी तब्बल नव्वद निवडणुकांमध्ये स्वतःच्याच पक्षाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. स्वपक्षाला हरविणे ही एक कला आहे. त्यात ते तरबेज आहेत. त्यामुळे राहुल गांधी हा भारतीय जनता पक्षासाठी हुकमी एक्का आहे, अशी उपरोधिक आणि बोचरी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केली आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी गुजरात दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांबद्दल संशय व्यक्त केला. काँग्रेसचे कोण कोण कार्यकर्ते भाजपासाठी काम करतात, यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता गांधी यांनी व्यक्त केली. गुजरात काँग्रेस मधला मोठा गट भाजपाशी हातमिळवणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या विधानावरून भाजपकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

राहुल गांधी यांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि आपण पक्षासाठी निरुपयोगी का ठरत आहोत, हे समजून घ्यावे. प्रत्यक्षात गांधी हे स्वतःकडे वळून बघण्याऐवजी आपल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, निवडणूक आयोग, मतदार यादी आणि आता स्वतःच्याच पक्ष कार्यकर्त्यांवर फोडत आहेत, असे पूनावाला म्हणाले.

संवैधानिक संस्था, सरकार आणि माध्यमांवर सतत आरोप करणारे राहुल गांधी आता स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांनाच उघडपणे बदनाम करू लागले आहेत. अशा प्रकारचे उदाहरण कुठेही बघायला मिळणार नाही. वास्तविक राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केले तर त्यांना आढळून येईल की ते स्वतः पक्षाचे सर्वात वाईट नेते आहेत, अशा शब्दात राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी यांनी गांधी यांच्यावर टीका केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading