Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNE

पीआयएमएसईत ‘बुलरायझर्स’ कार्यशाळा – स्मार्ट मनी मूव्हजचा अनोखा अनुभव!

पुणे  : PIMSE मध्ये फिन्टोपेडिया च्या सहकार्याने ‘बुलरायझर्स’ या रोमहर्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्मार्ट मनी मूव्हज या संकल्पनेला चालना देण्यासाठी हा महाविद्यालयांतर्गत स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात आला.
कार्यशाळेची सुरुवात फिन्टोपेडियाचे मार्केटिंग मॅनेजर श्री. नचिकेत सेव यांच्या ज्ञानवर्धक सत्राने झाली. त्यांनी गुंतवणूक पद्धती, जोखीम व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या माहितीपूर्ण सत्राने विद्यार्थ्यांमध्ये वित्तीय जागरूकता निर्माण केली.
यानंतर, विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्टॉक मार्केट गेम च्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टॉप तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना वित्तीय निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरला आणि शिक्षण व प्रत्यक्ष अनुभव यांचा उत्तम संगम घडवला!

Leave a Reply