स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अत्याचाराची घटना घडली. या आरोपीच्या शोधासाठी १३ पथके घेत होती. अखेर या आरोपीला गुणाट या गावातून पोलिसांनी अटक केली.
मंगळवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बऱ्याच संघटनाकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलन केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी १३ ठिकाणी पथक रवाना केली. तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारे देखील शोध घेतला जात होता. तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तीना फोन केले होते.
त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती. त्याच दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षीस देखील जाहीर केले होते. तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या गावामध्ये पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून दिवसभर आरोपीचा शोध घेतला.
आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पाणी पिण्यास आला होता. मला पश्चाताप झाला असून पोलिसांसमोर हजार होयचे आहे, असे सांगून आरोपी हा नातेवाईकांच्या घरापासून निघून गेला. आरोपी गाडे ज्या ठिकाणावरुन आला होता, तिथे परतलाच नव्हता. तो नातेवाईकांच्या घराजवळच्या परिसरात एका कॅनॅालमध्ये झोपून राहिला होता. येथे तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचे स्पष्ट केले आणि पोलिसांना कळवले.
मात्र बऱ्याच अडथळ्यांचा सामना पोलिसांना करावा लागला, अखेर रात्रीच्या सुमारास गुणाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपींला पोलिसांनी अटक केली असून लष्कर पोलिस स्टेशन येत आणण्यात आले आहे. या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी कळवले.
