Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुण्यामध्ये संपन्न होणार ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा’

पुणे : सुप्रसिद्ध विधिलिखित ज्योतिष कार्यालयाचे संचालक श्री. आदिनाथ मच्छिंद्र साळवी आणि ॲडव्होकेट सौ. वैशाली आदिनाथ साळवी यांच्या वतीने ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा – २०२५’ आयोजित केला जाणार असून हा सोहळा दिनांक २२ ते २४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान म्हात्रे पूलाजवळ असलेल्या डी. पी. रोड येथील गोल्डन लिफ बँक्वेट्स लॉन्स येथे पार पडेल अशी माहिती या सोहळ्याचे कार्याध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद चव्हाण यांनी दिली.

या आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे उदघाटन महाभारतातील ‘भीष्माचार्यांची भूमिका साकारलेले मुकेश खन्ना यांच्या हस्ते शनिवार, दिनांक २२ फेब्रवारी रोजी सकाळी १०:०० वाजता होणार आहे. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी महाभारतामध्ये अर्जुनाची भूमिका केलेले फिरोज खान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर दिनांक २४ फेब्रुवारी रोजी समारोपाच्या सोहळ्यास महाभारतातील कृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेले नितीश भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या शिवाय अनेक मान्यवर या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमा दरम्यान संपूर्ण भारतभरातील ३३ नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. या सोहळ्या दरम्यान मरणोत्तर विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार आणि विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार उपस्थित सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच कै. मच्छिंद्र नामदेव साळवी स्मृती निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीमती रंगुबाई मच्छिंद्र साळवी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

हा सोहळा ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक, जाणकार व रसिकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading