Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

नाट्य कलाकार घडण्यासाठी तळेगाव दाभाडेमध्ये पोषक वातावरण : सिद्धेश्वर झाडबुके

 

अ.भा.म. नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने आयोजित आंतरशालेय बालनाट्य एकांकिका स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे : मुलांमध्ये अभिनय अंगभूत असतो. फक्त त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळवून दिले पाहिजे. कलाकार घडण्यासाठी तळेगाव दाभाडेमध्ये पोषक वातावरण आहे. त्यामुळेच इथे चांगल्या कलाकृती घडत आहेत, असे प्रतिपादन नाट्य अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले. दरम्यान, माध्यमिक गटातून आदर्श विद्यामंदिर या प्रशालेच्या ‘घे भरारी’ या नाटिकेने प्रथम क्रमांक, प्राथमिक गटातून जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे यांच्या ‘लांबच लांब शेपूट’ या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळवला. भव्य फिरता करंडक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र रोख रक्कम असे बक्षीसाचे स्वरूप होते.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने पै. मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ थोर साहित्यिक गो.नी. दांडेकर करंडक आंतरशालेय बालनाट्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राथमिक गटातून अकरा शाळा आणि माध्यमिक गटातून नऊ शाळांनी सहभाग घेतला. श्रीरंग कलानिकेतनच्या रंगमंचावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पं. सुरेश साखवळकर यांच्या हस्ते झाले. तर पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, कार्याध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक विलास काळोखे, परीक्षक मधुवंती हसबनीस, स्पर्धाप्रमुख नयना डोळस, भारतीताई धोत्रे, नितीन शहा, विश्वास देशपांडे, संजय वाडेकर, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक उपस्थित होते.
सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा मावळ तालुक्यापुरती सीमित असलेली ही स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्याचा मानस आहे. गणेश काकडे म्हणाले, समाजोपयोगी उपक्रमास व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदैव तत्पर राहू. मधुवंती हसबनीस म्हणाल्या, की मुलांनी वाचलेल्या गोष्टींचे रूपांतर नाटकात करण्याचा प्रयत्न केल्यास ही मुले उद्याचे लेखक, दिग्दर्शक नक्कीच बनतील. पालकांनी मुलांना लिहिते केले पाहिजे.
चेतन पंडित, विराज सवाई, मधुवंती हसबनीस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्राथमिक विभागाच्या निकालाचे वाचन प्रा. अशोक जाधव यांनी, तर माध्यमिक विभागाच्या निकालाचे वाचन स्पर्धाप्रमुख नयना डोळस यांनी केले. प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी, सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख भगवान शिंदे यांनी, तर आभार विश्वास देशपांडे यांनी मानले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन शहा, नयना डोळस, भगवान शिंदे, अशोक जाधव, मंजुश्री बारणे, दीपाली पाटील, मीनल रणदिवे, युगंधरा बढे, ज्योती राठोड, सुनील करंजे, तानाजी मराठे, डॉ. मिलिंद निकम यांनी परिश्रम घेतले.
———————————–
स्पर्धेचा निकाल :
माध्यमिक गट निकाल (सांघिक) :
प्रथम क्रमांक – आदर्श विद्या मंदिर (नाटक – घे भरारी)
द्वितीय क्रमांक – जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे (नाटक – चिऊ काऊ)
तृतीय क्रमांक – सह्याद्री इंग्लिश स्कूल (नाटक – सिंहगडाला जेव्हा जाग येते)
उत्तेजनार्थ – स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल (नाटक – नव्या युगातील झाडाची नवी कहाणी)

प्राथमिक शाळा गट (सांघिक) :
प्रथम क्रमांक – जैन इंग्लिश स्कूल (नाटक – लांबच लांब शेपूट)
द्वितीय क्रमांक – पैसाफंड प्राथमिक शाळा ब (नाटक – यात चूक कुणाची)
तृतीय क्रमांक – आदर्श प्राथमिक विद्या मंदिर (नाटक – जादूचा शंख)
उत्तेजनार्थ – पैसाफंड प्राथमिक शाळा अ (नाटक – अहो आमचं ऐका)

नाट्यलेखन :
माध्यमिक विभाग : प्रथम, द्वितीय क्रमांक अनुक्रमे अनघा कुलकर्णी, विजयमाला गायकवाड यांना;
प्राथमिक विभाग : प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे मेघना विरकर, ज्योती कोरे

नाट्यदिग्दर्शन :
माध्यमिक विभाग : प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे कौस्तुभ ओक व प्रतीक्षा ढवळे, सुजाता डावखरे
प्राथमिक विभाग : प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे सुमेध सोनवणे, श्रद्धा आल्हाट

नेपथ्य :
माध्यमिक विभाग : प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे जाई गायकवाड व श्रीहरी तनपुरे
प्राथमिक विभाग : प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे प्रतिभा देवकर व जाई गायकवाड

पार्श्वसंगीत :
माध्यमिक विभाग : प्रथम क्रमांक ऋग्वेद अरानके
प्राथमिक विभाग : प्रथम क्रमांक आयुष ढोरे

वैयक्तिक अभिनय :
माध्यमिक विभाग : प्रथम क्रमांक अनिशा गायकवाड, द्वितीय क्रमांक श्रेयस महाले, तृतीय क्रमांक श्रुतिका लांडे, उत्तेजनार्थ श्रीहरी टिळेकर व ओंकार राठोड
प्राथमिक विभाग : प्रथम क्रमांक प्रियदर्शनी कैरवाडगी, द्वितीय क्रमांक समर्थ कालेकर, तृतीय क्रमांक सिद्धी देशपांडे, उत्तेजनार्थ अन्वेष हिंगे व आदिती गुडमे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading