Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

टीसीएसने एरो इंडिया २०२५ मध्ये प्रस्तुत केले एरोस्पेस आणि डिफेन्सचे भविष्य

बंगलोर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) एरो इंडिया २०२५ मध्ये एरोस्पेस आणि संरक्षण (एअँडडी) क्षेत्रामध्ये आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने, सेवासुविधा प्रदर्शित करून सर्वांना प्रभावित करत आहे. एरोस्पेस उद्योगक्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तज्ञ म्हणून कार्यरत असलेली टीसीएस विमान अभियांत्रिकी, एव्हियोनिक्स, डिजिटल उत्पादन आणि एआय-चालित एयरोस्पेस सोल्युशन्समध्ये अभूतपूर्व प्रगती करत, सुरक्षित व स्थिर भविष्यासाठी सज्ज आकाशाला बळकट करत आहे.

एयरो इंडिया २०२५ मध्ये, टीसीएस जगातील काही सर्वोत्तम ओईएम, पुरवठादार आणि एअरलाईन कंपन्यांसोबत जवळून काम करून संपूर्ण एअँडडी मूल्य शृंखलेमध्ये आपल्या मजबूत आणि सखोल क्षमता प्रदर्शित करत आहे. तुम्ही अद्याप टीसीएस बूथला भेट दिली नसेल, तर इथे ठळक माहिती देत आहोत:

  • टीसीएसचे अत्याधुनिक विमान अभियांत्रिकी आणि एव्हियोनिक्स: प्रगत डिजिटल उत्पादन, एव्हियोनिक्स सिस्टम आणि एआय-संचालित भविष्यसूचक देखभाल.
  • एअँडडीसाठी डिजिटल परिवर्तन: टीसीएस एआय, क्लाउड आणि डेटा ॲनालिटिक्ससह विमान डिझाइन, उत्पादन आणि जीवनचक्र व्यवस्थापनात क्रांती करत आहे.
  • शाश्वत आणि सुरक्षित एरोस्पेस सोल्यूशन्स: ग्लोबल एव्हिएशनमध्ये कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि अनुपालनास प्रोत्साहन देणारी नवकल्पना. यामध्ये टीसीएसने रोल्स रॉयससोबत भागीदारी करून तयार केलेल्या जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या विमान इंजिनाचा समावेश आहे, हा उपक्रम २०५० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे विमान उद्योगाचे लक्ष्य पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

एयरोस्पेस आणि संरक्षणामध्ये टीसीएसने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे

टीसीएस पहिली भारतीय कंपनी आहे जी मोठ्या प्रमाणावर एअँडडी सेवा प्रदान करते.

  • ६००० पेक्षा जास्त डोमेन तज्ञांसह टीसीएस नागरी आणि संरक्षण विमानचालनामध्ये डिजिटल परिवर्तनाला शक्ती प्रदान करते आणि जागतिक स्तरावरील आघाडीच्या ६६ मिलियनपेक्षा जास्त तासांच्या प्रोजेक्ट्सना सक्षम करत आहे. इतर उद्योगांच्या सर्वश्रेष्ठ क्षमतांचा उपयोग करण्याची टीसीएसची क्षमता देखील कंपनीला भविष्यासाठी तयार आकाशासाठी ग्राहक अनुभवांची नवी व्याख्या तयार करण्यात मदत करत आहे.

उद्योग क्षेत्रातील अग्रणी टीसीएसवर विश्वास ठेवतात

टीसीएस काही उत्तम जागतिक एयरफ्रेम उत्पादक/इंटिग्रेटर्स, इंजिन उत्पादक, टीयर पुरवठादार, एमआरओ सेवा पुरवठादार आणि एयर नेव्हिगेशन कंपन्यांसोबत मिळून त्यांच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे.

विशेष माहिती आणि नावीन्य

टीसीएसची सोल्युशन्स एआय-चालित विमान उत्पादनापासून जगातील पहिल्या हायड्रोजन-चालित विमान इंजिनाचे उत्पादन आणि एआय-चालित विमान देखरेख करण्यापर्यंत एयरोस्पेसच्या भविष्याला आकार देत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading