Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

भारतात सौंदर्य सेवांची मागणी 153% नी वाढली

– जस्टडायलचा निष्कर्ष

 

–          सौंदर्य सेवेच्या मागणीत मेट्रो शहरांमध्ये लक्षणीय 192% वाढ झाली आहे

–          हेअर स्पाला जास्त मागणी होती, तर त्या संबंधीच्या सर्चमध्ये उल्लेखनीय 219% वाढ झाली

–          उन्हाळ्यापासून हिवाळ्यापर्यंत, सौंदर्य सेवा शोधांमध्ये 42% वाढ झाली

–          ‘ब्युटी पार्लर फॉर पेडिक्युअर’ च्या शोधात लक्षणीय 64% वाढ झाली

जस्टडायल, भारतातील नंबर 1 च्या लोकल सर्च इंजिनने, गेल्या वर्षाच्या तुलनेत 2024 मध्ये सौंदर्य सेवांच्या मागणीत लक्षणीय वाढ दर्शवली आहे. याच्या विश्लेषणामध्ये 2023 आणि 2024 च्या हिवाळ्याच्या महिन्यात (नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत) तसेच उन्हाळा 2024 ते हिवाळा 2024 या कालावधीतील सर्च ट्रेंडची तुलना केली गेली.

या डेटानुसार 2023 मधील याच कालावधीच्या तुलनेत 2024 च्या हिवाळ्यात संपूर्ण भारतातील सौंदर्य सेवा शोधांमध्ये 153% नी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने मेट्रो शहरांमध्ये झाली असून तेथे या वाढीचे प्रमाण 192% आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2024 मध्ये दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि चेन्नईमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सौंदर्य सेवा शोधात तिप्पट वाढ झाली. कोलकाता आणि पुण्यातील शोधांमध्ये  2.5 गुणा झाली आहे, तर अहमदाबादमधील सर्च गेल्या वर्षीच्या दुप्पट आहेत.

नॉन-मेट्रो शहरांमधील मागणीत भरीव 131% ची वाढ झाली आहे. चंदीगडमधील शोध तिप्पट झाले आहेत तर जयपूरमधील सर्चिंग 2.5 गुणा झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत इंदूरमधील शोध दुप्पट आहेत.

यातही विशिष्ट सेवा श्रेण्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. 219% वाढीसह, हेअर स्पा प्रमुख सर्च म्हणून समोर आला आहे. तर शहरांच्या बाबतीत मुंबईने आघाडी घेतली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत 6 पट वाढ यंदा झाली आहे. त्यानंतर हैदराबाद आणि पुणे 3.5x तर नंतर अहमदाबादचा 2.5x नंबर लागतो. टॅन रिमूव्हल फेशियल सेवांमध्ये देखील लक्षणीय 124% वाढ दिसून आली.

देशभरात ‘ब्युटी पार्लर फॉर पेडिक्युअर’चा शोध 64% नी वाढला, ज्यात मुंबई 65% ने आघाडीवर आहे, तर चेन्नई 64%, बंगळुरू 60% आणि दिल्ली 37% वर आहे.

उन्हाळा 2024 आणि हिवाळा 2024 ची तुलना करताना, संपूर्ण भारतातील सौंदर्य सेवा शोधांमध्ये 42% ची वाढ दिसून आली. 65% वाढीसह ही वाढ मेट्रो शहरांमध्ये अधिक स्पष्ट होती. मुंबईत सर्वाधिक 88%, त्यानंतर पुण्यात 73%, हैदराबाद 72%, अहमदाबाद 71%, बंगळुरू 67%, चेन्नई 52%, दिल्ली 49% आणि कोलकाता 31% इतकी वाढ झाली. नॉन-मेट्रो शहरांमध्येही 30% वाढ झाली, यात जयपूर 66% आणि इंदूर 17% वर आघाडीवर आहे.

उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यातील शोधांमध्ये 84% वाढीसह, हेअर स्पा ही लोकप्रिय श्रेणी बनली आहे. 2024 च्या उन्हाळ्यात जे सर्चिंग झाले, त्यापेक्षा 3 पटीने वाढ होऊन मुंबईने आघाडी घेतली, त्यानंतर हैदराबाद 2.5x आणि पुणे 2x वर होते. हिवाळ्यात ‘ब्युटी पार्लर फॉर पेडीक्युअर’ च्या शोधात माफक 5% वाढ झाली, ज्यात मुंबई 46%, चेन्नई 21% आणि बंगळुरू 11% वर आहे.

भारतातील विकसनशील सौंदर्य उद्योगाबद्दल हे विश्लेषण महत्त्वाचा दृष्टीकोन देतात. मागणीतील लक्षणीय वाढ, विशेषत: हिवाळ्याच्या महिन्यांत आणि विविध सेवा श्रेणींमध्ये, स्वत: ची काळजी तसेच वैयक्तिक ग्रूमिंगवर दिला जाणारा भर दर्शवते. हा डेटा व्यावसायिक सौंदर्य सेवांसाठी असलेली वाढती मागणी आणि प्राधान्यावर प्रकाश टाकतो. तसेच आपल्यासाठी सोयीस्कर आणि प्रवेशयोग्य पर्यायांकडे ग्राहक वळत असल्याचे सूचित करतो.

परिशिष्ट

संपूर्ण देशभरात :

  • हिवाळा 2023 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 153% वाढ
  • उन्हाळा 2024 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 42% वाढ

मेट्रो शहरे:

–         हिवाळा 2023 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 192% वाढ

–         दिल्ली, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, चेन्नईतील शोध 3x झाले आहेत

–         कोलकाता, पुण्यातील शोध 2.5x झाले आहेत

–         अहमदाबादमधील शोध 2x झाले आहेत

–         उन्हाळा 2024 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 65% वाढ

–         मुंबई : 88% वाढ

–         पुणे : 773% वाढ

–         हैदराबाद : 72% वाढ

–         अहमदाबाद : 71% वाढ

–         बंगळुरू: 67% वाढ

–         चेन्नई: 52% वाढ

–         दिल्लीः 49% वाढ

–         कोलकाता: 31% वाढ

नॉनमेट्रो शहरे:

  • हिवाळा 2023 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 131% वाढ

–         चंदीगडमधील शोध 3x झाले आहेत

–         जयपूरमधील शोध 2.5x झाले आहेत

–         इंदूरमधील शोध 2x झाले आहेत

  • उन्हाळा 2024 विरुद्ध हिवाळा 2024: सौंदर्य सेवा शोधांमध्ये 30% वाढ

–         जयपूर : 66% वाढ

–         इंदूर: 17% वाढ

सर्वाधिक सर्च:

  • हेअर स्पा:

–         हिवाळा 2023 विहिवाळा 2024 : 219% वाढ

  • मुंबईतील शोध 6x झाले आहेत
  • हैदराबाद, पुण्यातील शोध 3.5x झाले आहेत
  • अहमदाबादमधील शोध 2.5x झाले आहेत

–         उन्हाळा 2024 विरुद्ध हिवाळा 2024: 84% वाढ

  • मुंबई शोध 3x झाले आहेत
  • हैदराबाद शोध 2.5x झाले आहेत
  • पुणे शोध 2x झाले आहेत
  • टॅन रिमूव्हल फेशियल सर्व्हिसेस124% वाढ (हिवाळा 2023 विहिवाळा 2024)
  • पेडीक्युअरसाठी ब्युटी पार्लर:

–         हिवाळा 2023 विहिवाळा 2024: 64% वाढ

  • मुंबई : 65% वाढ
  • चेन्नई: 64% वाढ
  • बंगलोर: 60% वाढ
  • दिल्ली: 37% वाढ

–         उन्हाळा 2024 विरुद्ध हिवाळा 2024: 5% वाढ

  • मुंबई: 46% वाढ
  • चेन्नई: 21% वाढ
  • बंगळुरू: 11% वाढ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading