टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन प्रस्तुत केला: आधुनिक युगात सेवानिवृत्तीनंतरच्या गरजांसाठी एक खास सोल्युशन
मुंबई : करियरमध्ये होत जाणारे नवनवीन बदल आणि वाढते आयुर्मान यांच्या पार्श्वभूमीवर आधुनिक युगातील सध्या नोकरी, व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना अशा योजना हव्या असतात ज्या पारंपरिक सेवानिवृत्ती नियोजनाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या गरजा, इच्छा-आकांक्षा पूर्ण करू शकतील. FIRE (फायनान्शियल इंडिपेन्डन्स रिटायर अर्ली) पिढी असो, महत्त्वाकांक्षी उद्योजक असोत किंवा करियरमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या व्यक्ती असोत, रियरमेंट प्लॅनर्स एक प्रभावी रिटायरमेंट कॉर्पस सुरक्षित करण्याच्या स्मार्ट पद्धतींना प्राधान्य देत आहेत. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी (GBD) २०२१ मधील अनुमानांनुसार, २०५० पर्यंत भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान सरासरी ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते सरासरी ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील. त्यामुळेच आजच्या काळात नवीन, लवचिक आणि विकासोन्मुख आर्थिक योजनांची आवश्यकता पहिल्यापेक्षा खूप जास्त वाढली आहे.
ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन लॉन्च केला आहे. हा एक नवीन युनिट-लिंक्ड पेन्शन प्लॅन (ULIP) आहे आणि नव्या काळातील रिटायरमेंट आवश्यकतांनुसार डिझाईन करण्यात आला आहे. दुसरा स्वतंत्र उत्पन्न स्रोत तयार करण्यापासून सेवानिवृत्ती काळासाठीची बचत सुरक्षित ठेवण्यापर्यंत, ही योजना डिजिटल सॅव्ही आणि आर्थिक सुरक्षा व स्वातंत्र्य हव्या असणाऱ्या आधुनिक प्रोफेशनल्सच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करते.
आजच्या काळात स्मार्ट रिटायरमेंट प्लॅनिंग महत्त्वाची का आहे:
- वाढते आयुर्मान: भारतीय पुरुष आणि महिलांचे आयुर्मान ४ ते ५ वर्षांनी वाढेल, म्हणजेच ते ७६ ते ८० वर्षे वयापर्यंत जिवंत राहतील अशी अपेक्षा आहे (जीबीडी स्टडी २०२१), सेवानिवृत्त लोकांना दीर्घकाळपर्यंत स्थिर उत्पन्नाची आवश्यकता असणार आहे.
- डेमॉग्राफिक्समध्ये बदल: भारतातील लोकसंख्येमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त मिलेनियल्स (४४० मिलियन) आहेत, सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये त्यांना वाढलेले आयुर्मान आणि पारंपरिक पेन्शन लाभांची कमतरता या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागेल.
- उद्योजक मानसिकता: करियरमध्ये बदल करण्याकडे कल वाढत आहे, जास्तीत जास्त लोक आपले स्वतःचे स्टार्टअप व्यवसाय सुरु करत आहेत. असे करत असताना ते आपल्या सेवानिवृत्तीसंबंधी गरजा देखील पूर्ण करू इच्छितात.
- जीवनशैलीशी संबंधित इच्छाआकांक्षा: आधुनिक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते की सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांची जीवनशैली पूर्वीप्रमाणे कायम राखली जावी. त्यांच्यासाठी मार्केट-लिंक्ड विकासाच्या संधी आणि लवचिक योजना आवश्यक असतात. उदाहरणार्थ, अनेक सेवानिवृत्त व्यक्तींची इच्छा असते, लक्झरी कार खरेदी करावी किंवा कार अपग्रेड करावी किंवा परदेशात सुट्टीसाठी जावे, ज्या गोष्टी ते काम करत असताना करत होते त्याच त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील करत राहायच्या असतात. त्यासाठी स्मार्ट आर्थिक योजना आणि गुंतवणुकीची गरज असते, जेणेकरून त्यांच्यासाठी हे सर्व संभव होऊ शकेल.
- जीवनावश्यक खर्च वाढत आहेत: वैद्यकीय महागाईचा दर १०% च्या आसपास आहे आणि जीवनावश्यक खर्च वाढत आहेत. सेवानिवृत्ती योजनांमध्ये विकासाच्या शक्यतांबरोबरीनेच नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या तरतुदींची देखील आवश्यकता आहे.
टाटा एआयएची स्मार्ट पेन्शन सिक्युअर योजना या बदलत्या ट्रेंड्सच्या दिशेने एक पुढचे पाऊल आहे. सेवानिवृत्तीच्या काळात सुरक्षित आणि समाधानी आयुष्य जगण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांसाठी मार्केट-लिंक्ड वाढ, लवचिकता आणि मनःशांती प्रदान करते.
टाटा एआयएची स्मार्ट पेन्शन सिक्युअर योजना ग्राहकांना चिंतामुक्त जीवन जगण्यात मदत करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. या योजनेतून मिळणारे काही प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे आहेत:
- निवृत्तीचे वय होण्याआधीच निवृत्तीची योजना: या योजनेच्या मदतीने तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्त होण्याची योजना करू शकता. पूर्ण लवचिकता!
- मार्केट-लिंक्ड रिटर्न्स: सर्व मालमत्ता वर्गांमध्ये अनेक फंड्स, ज्यामध्ये १००% फंड वाटप इक्विटीमध्ये करण्याचा पर्याय आहे. कोणत्याही खर्चाशिवाय अमर्यादित फंड-स्विच.
- किफायतशीर योजना: तुमचा संपूर्ण प्रीमियम तुमच्या आवडीच्या फंडात गुंतवला जातो, ज्यामुळे तुमचे पैसे वाढू शकतात आणि तुमच्या इच्छेनुसार निवृत्तीचा मार्ग मोकळा होतो.
- गुंतवणुक करत राहिल्याबद्दल बक्षीस: ऑनलाइन खरेदीबरोबरीनेच अतिरिक्त फंड बूस्टर आणि लॉयल्टी ॲडिशन्स मिळतात.
- हेल्थ बडी: आनंदी आणि “निरोगी” सेवानिवृत्ती सुनिश्चित करण्यासाठी, हेल्थ बडी ही एक पूरक सेवा आहे. ग्राहकांच्या सोयीनुसार फार्मसी खरेदी आणि निदान चाचण्यांवर आकर्षक सवलती दिल्या जातात. हेल्थ सिक्युर रायडरची निवड करून ग्राहक ओपीडी सेवा देखील घेऊ शकतात.
- कर लाभ: कलम ८०सीसीसीअंतर्गत कर वाचवा आणि परिपक्वतेच्या वेळी एकरकमी रकमेवर ६०% करमुक्त लाभ मिळवा.
- अतिरिक्त संरक्षण कव्हरेज: संकटाच्या वेळी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रीमियम माफीचा पर्याय देखील आहे.
स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन टाटा एआयए अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंडसोबत उपलब्ध आहे. नवीन फंड ऑफरची किंमत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत १० रुपये प्रति युनिट आहे.
टाटा एआयए अल्फा ५० इंडेक्स पेन्शन फंड – एक ग्रोथ कॅटॅलिस्ट:
टाटा एआयए अल्फा ५० इंडेक्स हे पेन्शन फंड पॉलिसीधारकांसाठी एक शक्तिशाली गुंतवणूक साधन आहे. फंडाची ८०-१००% मालमत्ता निफ्टी अल्फा ५० इंडेक्स बेंचमार्कशी जोडलेल्या इक्विटी साधनांमध्ये गुंतविली जाते. उच्च कामगिरी करणाऱ्या समभागांना ट्रॅक करणारा परतावा वितरीत करणे हे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे सेवानिवृत्ती निधीमध्ये स्थिर वाढ सुनिश्चित होईल. नवीन फंड ऑफर (NFO) २४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रु. १० प्रति युनिट दराने सुरू आहे.
टाटा एआयएने गुंतवणुकीशी संबंधित योजनांमध्ये आपली क्षमता संपादन केली आहे, त्यांचे फंड परफॉर्मन्स सातत्याने बेंचमार्कपेक्षा जास्त सरस असतात. कंपनीचे ९९.९३% फंड AUM ला जागतिक स्तरावर प्रसिद्ध रेटिंग एजन्सी मॉर्निंगस्टारने ४ किंवा ५ स्टार (५ वर्षांच्या आधारे) रेटिंग दिले आहे. उद्योगक्षेत्रातील ४ किंवा ५ स्टार रेटिंग दिलेल्या ३०% पेक्षा कमी फंड AUM च्या सरासरीपेक्षा हे खूप जास्त आहे.
आजच्या काळातील कर्मचारी, व्यावसायिकांसाठी ही योजना गेम चेंजर का आहे
- निवृत्तीनंतर तुमचा उत्पन्नाचा स्रोत: मार्केट-लिंक्ड गुंतवणुकीची लवचिकता, शून्य प्रीमियम वाटप शुल्क, ही योजना मजबूत आर्थिक कुशन निर्माण करण्यात सक्षम बनवते. इक्विटी वाढीवर लक्ष केंद्रित करून एक मजबूत सेवानिवृत्ती फंड तयार करण्यात मदत करते. उत्पन्नाचे दुसरे स्रोत, उद्योजकीय महत्त्वाकांक्षा, वयाच्या आधीच निवृत्तीचे समर्थन करते.
- इक्विटी बाजारातील हालचालींशी जुळवून घेण्यासाठी लवचिक गुंतवणूक: शून्य-खर्चाचे फंड-स्विचिंगचे अमर्यादित पर्याय पॉलिसीधारकांना त्यांच्या विकसित आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, बाजार परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवतात.
- डिजिटल नेटिव्हसाठी डिझाइन केलेली योजना: टाटा एआयएच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये एकीकृत केलेल्या योजनेमध्ये आधुनिक सहयोगींना सहभागी करून घेण्यात आले आहे. कमी वेळात, अतिशय सोयीस्कर खरेदीचा अनुभव ज्यांना पसंत आहे अशा आधुनिक व्यावसायिकांना ही योजना सुविधाजनक अनुभव देते.
- जीवनशैली कायम राखली जाते: सहली, प्रवासासंबंधीच्या आकांक्षा पूर्ण करणे असो किंवा जीवनशैली कायम राखणे असो, ही योजना ग्राहकांना सुरक्षित आणि परिपूर्ण भविष्याची रचना करण्यासाठी साधन प्रदान करते. फंडाचे इक्विटी फोकस सातत्यपूर्ण संपत्ती निर्मिती सुनिश्चित करतो. दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्य आणि वाढीसाठी नियोजन करणाऱ्यांसाठी हा एक विश्वासार्ह पर्याय बनतो.
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे प्रेसिडेंट आणि चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्री जिलानी बाशा यांनी सांगितले, “मिलेनियल्स आणि फायर ऍस्पिरेन्ट्सना नवीन युगाच्या आर्थिक योजना हव्या असतात. निवृत्तीच्या वयाच्या आधी निवृत्त होणे आणि जास्तीत जास्त धन बनवणे यांना ते प्राधान्य देतात. टाटा एआयए स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन, टाटा एआयएची वेबसाईट आणि पॉलिसीबझार, टाटा नेउ आणि फोनपे यासारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. ही योजना आजच्या काळातील ग्राहकांना आपले आर्थिक भविष्य सहजपणे सांभाळण्यात सक्षम बनवते. ही योजना अशा व्यक्तींसाठी डिझाईन करण्यात आली आहे जे लवचिकता, विकास आणि सहजसोप्या ऑनलाईन अनुभवाला महत्त्व देतात, ही योजना आपल्या जीवनातील सोनेरी वर्षांमध्ये प्रत्येक काळासाठी सदैव तयार राहण्यासाठी मदत करते.”
डिजिटल सुविधा सर्वात मूलभूत वैशिष्ट्य
ही योजना टाटा एआयएच्या प्लॅटफॉर्मवर आणि पॉलिसीबझार, टाटा नेउ आणि फोनपे*सहित सर्व डिजिटल पार्टनर इकोसिस्टिमच्या माध्यमातून ऍक्सेस करता येते. तुम्ही कधीही, कुठूनही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या सहयोगामुळे टाटा एआयएचा ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि या प्लॅटफॉर्म्सच्या प्रगत क्षमता यांना एकत्र आणले गेले आहे. फिजिकल डॉक्युमेंटेशन न करता तुम्ही पॉलिसी खरेदी करू शकता. याखेरीज प्लॅनचा डिजिटल इंटरफेस वापर करण्यासाठी खूपच सोपा आहे. इथे तुम्ही तुमच्या रिटायरमेंट गुंतवणुकीचे मॉनिटरिंग, व्यवस्थापन आणि अनुकूलन सहजपणे करू शकता. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी आणि निवृत्तीनंतरची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी एक सुव्यवस्थित आणि टेक-सॅव्ही सोल्युशन प्रदान करते.
पॉलिसीबझारमध्ये लाईफ इन्श्युरन्सचे सीबीओ श्री संतोष अग्रवाल यांनी सांगितले, “भारतामध्ये न्यूक्लियर कुटुंबांची संख्या आणि आयुर्मान वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिटायरमेंट प्लॅनिंगप्रती दृष्टिकोन विकसित होत आहे. हा बदल दर्शवतो की, अनेक वर्षे काम केल्यानंतरची वर्षे आरामात आणि संपूर्ण स्वातंत्र्यानिशी जगता यावीत यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही या प्राथमिकता ध्यानात घेऊन पॉलिसीबझारला नव्या काळातील युएलआयपी पेन्शन प्लॅन म्हणून अनुकूलित आर्थिक सोल्युशन लॉन्च करण्यासाठी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्ससोबत सहयोग केला आहे. हा प्लॅन येत्या वर्षांसाठी विकास संधी आणि स्थिरता यांच्यात संतुलन साधण्याचा एक सुव्यवस्थित मार्ग आहे. हा सहयोग लोकांना रिटायरमेंट प्लॅनिंग करता यावे यासाठी आवश्यक संसाधनांनी सुसज्ज करण्याची पॉलिसीबझारची वचनबद्धता दर्शवतो.”
टाटा डिजिटलमध्ये चीफ बिझनेस ऑफिसर – इन्श्युरन्स श्री अमरीश खेर यांनी सांगितले, “टाटा डिजिटलमध्ये आमचा उद्देश ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार सर्वांसाठी आर्थिक नियोजन सहजसोपे बनवणे हा आहे. टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्ससोबत भागीदारीमध्ये स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन, आमच्या युजर्सना चिंता-मुक्त निवृत्ती जीवनाची योजना बनवण्यात मदत करण्याच्या दिशेने एक पुढचे पाऊल आहे. या योजनेसह टाटा नेउने पेन्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या रिटायरमेंट प्लॅनसोबत ग्राहक आपली बचत आणि गुंतवणुकीचे डिजिटल आणि सुविधाजनक पद्धतीने व्यवस्थापन करू शकतात. त्यामुळे ते आयुष्यातील प्रत्येक टप्प्यासाठी सुसज्ज होऊ शकतात – आणि हे सर्व त्यांच्यासाठी टाटा नेउवर उपलब्ध आहे.”
फोन पे इन्श्युरन्स बिझनेसचे हेड श्री निलेश अगरवाल यांनी सांगितले, “काम करत असलेल्या युवकांची संख्या भारतात खूप जास्त आहे, हे फायदेशीर आहे पण त्यासोबतच सुरक्षित भविष्याची तयारी करण्याची जबाबदारी देखील आहे. वाढती महागाई, मर्यादित सामाजिक सुरक्षा आणि कौटुंबिक संरचनेमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आजच्या काळात प्रभावी पेन्शन सोल्युशन्सची गरज पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लॅन लॉन्च करण्यासाठी टाटा एआयएसोबत भागीदारी केली आहे, जो लोकांना लवचिकता आणि आत्मविश्वासाने आपल्या आर्थिक भविष्याची जबाबदारी पेलण्यात सक्षम बनवतो, ज्यामुळे चिंता-मुक्त रिटायरमेंटसाठी मनःशांती सुनिश्चित होते.”
टाटा एआयएने विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या योजना खूप विचारपूर्वक तयार केल्या आहेत. यामध्ये दोन वेगवेगळे पर्याय आहेत, जे प्रत्येक प्रकारच्या जीवनशैली गरजा कव्हर करू शकतील:
दोन प्लॅन पर्याय, जे प्रत्येक जीवनशैलीसाठी अनुरूप असतील
१. स्मार्ट पेन्शन सिक्युअर: फंड-स्विचिंगमध्ये लवचिकता आणि मजबूत डेथ बेनिफिटसह मार्केट-लिंक्ड गुंतवणुकीवर केंद्रित.
२. स्मार्ट पेन्शन सिक्युअर प्लस: पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास योजनेची सुरक्षा कायम मिळत राहावी यासाठी यामध्ये प्रीमियममध्ये सूट लाभ देखील आहे.
योजनेची लवचिकता
- योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा: ३५ ते ७५ वर्षे (पेमेंट कालावधीप्रमाणे वेगवेगळी आहे)
- वेस्टिंग वय: ४५ व्या वर्षापासून सुरु होते, ज्यामध्ये सिंगल/लिमिटेड पेसाठी जास्तीत जास्त ८५ वर्षे आणि रेग्युलर पेसाठी ७५ वर्ष आहे.
- पॉलिसी कालावधी: १० वर्षांपासून जास्तीत जास्त वेस्टिंग वयापर्यंत.
टाटा एआयएची स्मार्ट पेन्शन सिक्युअर योजना मिलेनियल्सना हे अंतर दूर करण्यात आणि निवृत्तीनंतरचे जीवन चिंतामुक्त करण्यात सक्षम बनवते.
पॉलिसीबझार हे कंपोझिट ब्रोकर म्हणून नोंदणीकृत आहे. नोंदणी क्रमांक ७४२, नोंदणी कोड क्रमांक IRDA/DB 797/19, 09/06/2027 पर्यंत वैध, परवाना श्रेणी- कंपोझिट ब्रोकर
फोनपे इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड IRDAI डायरेक्ट ब्रोकर (लाइफ आणि जनरल) रजिस्टर ७६६ आणि ब्रोकर रजिस्ट्रेशन कोड IRDA/DB 822/20 10/08/2027 पर्यंत वैध आहे.
टाटा फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड [TFPL] ही टाटा डिजिटलची उपकंपनी आहे जी टाटा नेउ ऍपवर विमा उत्पादने ऑफर करते. टाटा फिनटेक हा टाटा एआयएचा कॉर्पोरेट एजंट आहे. नोंदणी क्रमांक – CA0818.
