Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘नव ताझ धाम’ या वृद्धाश्रमाची उभारणी

पुणे  : लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतर्फे वृद्धांना आपले उतरते आयुष्य आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात उपभोगता यावे म्हणून  ‘नव ताझ धाम’ या वृद्धाश्रमाची उभारणी  करण्यात आली आहे. सदर वृद्धाश्रम तळेगाव एमआयडीसी जवळ असेल्या अंबी या ठिकाणी उभारण्यात आले असून येणत्या रविवारी (दिनांक ९ फेब्रुवारी) रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर केंद्राचे उद्घाटन होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन फतेचंद रांका यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नव ताझ धाम प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत कोठडीया, प्रकल्प उपाध्यक्षा आशा ओसवाल, लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे अध्यक्ष चैताली पटणी, केअरिंग हँड्स संस्थेचे सचिव अंबादास चव्हाण व केअरिंग हँड्स संस्थेचे उपाध्यक्ष व जमीन देणगी स्वरूपात देणारे सुधीर नाईक उपस्थित होते.

केअरिंग हँड्स संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर नाईक यांनी आपली जमीन केअरिंग हँड्सला सामाजिक कार्यासाठी उपलब्ध करून दिली व लायन्स क्लब ऑफ पुना सारसबाग यांना या जागेमध्ये सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक असे वृद्ध सेवा केंद्र उभारण्यात यावे अशी विनंती केली. केंद्राच्या उभारणीसाठी रुक्शाना मेहेर अंकलेसरिया व त्यांचे पती मेहेर अंकलेसरिया यांनी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट ला साडेचार कोटीची देणगी दिली व या देणगी मधूनच १६,४२६ स्क्वेअर फुटाची दोन मजली वृद्धाश्रमाची इमारत उभारण्यात आली आहे अशी माहिती रांका यांनी दिली.

नव ताझ धाम येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जवळच्याच सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त असलेल्या हॉस्पिटल सोबत संस्थेने केलेले सेवा करार, नामांकित डॉक्टर द्वारे नियमित तपासणी, अनुभवी नर्सेस आणि काळजीवाहक, २४ तास गरम पाणी आदींचा समावेश आहे.  त्याचबरोबर योगासाने, भजन संध्या, मनोरंजनासाठी सर्व व्यवस्था, सर्व प्रकारचे खेळ, चित्रकला,संगीत तसेच सर्व सणवार साजरे करणे, परसबाग, वृक्ष लागवड आणि जोपासना, गो शाळेत तसेच निराधार बालकांची सेवा, शालेय विद्यार्थ्यांशी संवाद या प्रकारचे उपक्रम देखिल राबविण्यात येणार आहेत.

या इमारतीमध्ये पती-पत्नी यांना एकत्र राहण्याची सोय,  तीन जणांना एकत्र राहण्याची सोय करण्यात आली असून प्रत्येक खोलीला स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. ही  इमारत रुक्शाना मेहेर अंकलेसरिया यांचे  पिताश्री कै. नवल नरिमन व मातोश्री कै. ताझ नवल नरिमन यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली असल्याने या प्रकल्पास “नव ताझ धाम” असे नाव देण्यात आले आहे.

एकूणच आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात सर्व वृद्धांना संपन्न असे जीवन जगण्याची  शाश्वती लायन्स क्लब आणि केअरिंग हँड्स संस्थेने देऊ केली आहे. अर्थात या सेवांचा लाभ घेण्यासाठी काही शुल्क अदा करावे लागेल. त्यातही सर्व खर्च वजा जाता उर्वरित रक्कम विकास कामांकरिता तसेच निराधार मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाकरीता खर्च करण्यात येणार आहे असे फतेचंद रांका यांनी सांगितले.

या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:००० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास खासदर सुनेत्रा पवार, नागरिक हवाई वाहतूक व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या नगर विकास मंत्री माधुरी मिसाळ,  श्रीरंग बारणे व सुनील शेळके यांची देखील उपस्थिती असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading