Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात


पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला शनिवारी (दि. 21) सुरुवात झाली. रविवारी (दि.22) दोन सत्रात संघांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर पुरुषोत्तम करंडकावर कोण नाव कोरतो ते स्पष्ट होणार आहे. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.
शनिवारी सखा (आय. एम. सी. सी.), तेंडुलकर्स्‌ (म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज), 11,111 (फर्ग्युसन महाविद्याल) या एकांकिकांचे सादरीकरण झाले. तर रविवारी (दि. 22) सकाळच्या सत्रात पार्टनर (स. प. महाविद्यालय, पुणे), तृष्णाचक्र (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर), पाटी (विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती) या एकांकिकांचे तर सायंकाळच्या सत्रात देखावा (न्यू आर्टस्‌‍ कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर), बस नं. 1532 (गरवारे वाणिज्य महाविद्यालय), बिजागरी (बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी) या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading