आपल्या नौव्या वर्षात पदार्पण करित असताना, G5A ने आपल्या कलात्मक वारसा, गंभीर अशी संभाषणे आणि भव्य अशा आनंदायी क्षणांचा उलगडा केला
मुंबई : महालक्ष्मी येथील विविध शिस्तबद्ध अशा उपक्रमांनी सजलेला G5A परत आला आहे, ज्यामध्ये उत्तम आणि सखोल अनुभवांसह प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहेत, आव्हाने आणि ती पूर्ण करण्याकरिता प्रोत्साहन. हा भव्य दिव्य सोहळा, न विसरता येणाऱ्या क्षणांना घेऊन तीन महिने कल्पकता, उपचार आणि प्रकटीकरण घेऊन आला आहे.
२ ऑक्टोबर, २०२४ पासून उत्सवाची सुरवात होणार आहे, ती प्रसिद्ध अशा नृत्यांगना मल्लिका साराभाई यांच्या नृत्याने, पास्ट फ़ॉर्वर्ड नामक आपल्या नृत्यामध्ये त्या आम्हाला त्यांच्या मनमोहक कामगिरीने आपला वारसा, सहयोग तसेच शतकानुशतकांच्या नृत्यशैली आणि स्त्री आवाजाचा उत्क्रांतीचा प्रवास घडवून आणतील. गायिका अदिती रमेश या कार्यक्रमामध्ये आपल्या जॅझ आणि कार्नॅटिक संगीताची जोड देणार आहे.
त्यानंतरचा संध्याकाळी प्रेम आणि द्वेषा बद्दलचा चर्चांमध्ये (कन्वर्सेशन्स ऑन लव ॲन्ड हेट) सध्याचा पर्यावरणावर सखोल चर्चा ही नामवंत वक्तांकडून केली जाईल. ४ ऑक्टोबर रोजी (सॅन्ट्युरी डिबेट) अभयारण्यावरील वादविवादाचे संचलन, फ़े डी’सूझा यांचा द्वारे केले जाणार असून यामध्ये प्रसिद्ध तज्ञ अशा व्यक्ती दोन्ही बाजूला असतील आणि त्यांच्याद्वारे मुंबई हवामानातील लवचिकती उदाहरण मानले जाऊ शकते का याचा शोध घेतला जाईल.
महिन्याचा पहिल्या शनिवार -रविवारी असेल ते सिनेमा हाऊस, ज्यामध्ये सगळे अडथळे पार करून निर्माण झालेले आणि खऱ्या अर्थाने स्पॉटलाईट मध्ये आणायला हवे अशा चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. वैविध्यपूर्ण आवाज आणि कल्पक अशा भावना घेऊन यावेळेची सत्र असणार आहे, आणि म्हणूनच आम्हाला कलेची ताकत ही अधिक चिंतनशील पद्धतीने समोर यावी असे वाटते , त्याही पेक्षा महत्वाचे आहे की आपले उत्तम भविष्य घेऊन ती समोर यावी.
G5A चा संस्थापिका आणि कला दिग्दर्शिका अनुराधा पारिख यावेळी बोलताना म्हणाल्या
“नऊ वर्ष झाली! आनंद आणि विशेषता दोन्ही भावना मनात एकाच वेळी! मी त्या सगळ्यांची आभारी आहे ज्यांनी वेळ देऊन आणि बांधिलकीने G5A करिता सातत्याने कार्य केले आहे, हा नेहमीच आमचा कलागुणांचा एकत्रित प्रवास राहिला आहे; आमचा समूह न थकता अविरत इतकी वर्ष या सगळ्याकरता झटतो आहे आणि उत्तम असे कार्यक्रम सादर करतो आहे. मग ते सिनेमा असो इन्स्टॉलेशन्स असोत किंवा चर्चात्मक कार्यक्रम असोत. आम्ही या काही वर्षांमध्ये इतकं शिकलो आहे की आमच्या ध्येयाची नवीन व्याख्या आम्हाला मिळाली असून त्यामुळे शहराचा आणि देशाचा कलात्मक वारशा करिता आम्ही काही तरी करतो आहोत असा आमचा विश्वास आहे. संस्कृतीचा महत्वाप्रती असलेला आमचा विश्वास, विशेषत: आज द्विगुणीत झाला असून आम्ही काम करत असलेल्या कलाकारांसह तो नुतनीकृत देखील झाला आहे, प्रेक्षक आतुर्तेने आमची वाट बघत असतात आणि आमच्या साथीदारांना आमच्या दृष्टी आणि ध्येयावर विश्वास आहे हे फ़ार महत्वाचे आहे.”
G5A चे कला दिग्दर्शक, इशान बेनेगल यावेळी बोलताना म्हणाले:
“आमच्या ९व्या वर्षाकरिता, आम्ही नवीन कल्पनांसह येतो आहोत ज्याकरिता आम्ही सगळे उत्सुक आणि उत्साहाने पूर्ण आहोत. स्थिर अशा पद्धतीने गेली काही वर्ष आम्ही आमचे काम चोख करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या वर्षी देखील आम्ही प्रेक्षक आणि कलाकारांकरिता स्वतंत्र आणि सरावाने परिपूर्ण असे उपक्रम घेऊन आलो आहोत. आमचा उपक्रमातूनच आमचा संस्कृतीप्रती असलेला विचार आणि विश्वास आम्ही निडर होऊन आणि अगदी योग्य त्या पद्धतीने मांडतो.
