Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून छोटा पुढारी बाहेर!

‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ असणारा छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे ‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून बाहेर पडला आहे. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घन:श्यामने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही चांगलाच धमाका केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न घन:श्यामने केला. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा छोटा पुढारी ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना म्हणाला,”टास्क आहे.. खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चांगला माणूस कसा असावा हे बिग बॉस मराठीच्या घरामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी 100% टक्के बिग बॉस मराठीचा गेम परिपूर्ण खेळलो आहे”.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात घन:श्यामने एक चमक, धमक घेऊन प्रवेश केला होता. पण मध्ये अचानक तो शांत झाला आणि बाजी पलटली. यासंदर्भात बोलताना छोटा पुढारी म्हणाला,”इथे डोक्याने गेम चालतो आणि मी माझ्या मनाने गेम खेळलो आहे. माणसं जोडली, माणसांना मी माणसांप्रमाणे वागवत होतो पण लोकांनी डोक्यात ठेऊन गेम केला. माझा गेम कुठे चुकला, कुठे पलटला असं मला वाटत नाही. पण बिग बॉसच्या घरात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं एवढं मात्र मला कळलं”.

BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading