पुण्यात ७.५ टक्के एण्ट्री-लेव्हल नोकऱ्यांमध्ये वाढ : इनडीडच्या अहवालातील निष्कर्ष
पुणे : इनडीड या आघाडीच्या जागतिक मॅचिंग व हायरिंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एण्ट्री-लेव्हल कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अहवाल जारी केला. या अहवालानुसार, कंपनीच्या नियुक्ती करण्याच्या पद्धतींमध्ये झालेले मोठे परिवर्तन आणि ते महत्त्व देणारी कौशल्ये निदर्शनास येतात.
७६ टक्के एण्ट्री-लेव्हल नोकरीसाधक स्पर्धात्मक वेतनाला प्राधान्य देतात आणि त्यामधून सर्वाधिक फायदा मिळवतात. या पसंतींनुसार उच्च वेतनाचा क्रमांक आहे, जेथे ५३ टक्के नोकरीसाधक करिअर प्रगत करणाऱ्या संधींना महत्त्व देतात. फक्त ४७ टक्के नोकरीसाधक सकारात्मक कामकाज वातावरणाला महत्त्व देतात. पारंपारिक सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोकऱ्यांऐवजी गिग्स व फ्रिलॅन्स कामाप्रती पसंतीमधील या परिवर्तनामधून अधिक स्वायत्तेकडे वाटचाल दिसून येते. या बदलत्या प्राधान्यक्रमांना ओळखत नियोक्ते गतीशील रोजगार बाजारपेठेत टॉप टॅलेंटचे लक्ष वेधून कायम ठेवण्यासाठी स्पर्धात्मक वेतन आणि करिअरमध्ये वाढ करणाऱ्या संधींवर लक्ष केंद्रित करत आहेत.या तिमाहीमध्ये नियोक्ते देत असलेले सरासरी वेतन प्रतिमहिना जवळपास २५,००० रूपये आहे.
रोचक बाब म्हणजे, नियोक्ते आता फक्त टेक्निकल कौशल्यांऐवजी सॉफ्ट स्किल्समध्ये अपस्किल असलेल्यांची नियुक्ती करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. टीमवर्क, कम्युनिकेशन आणि एकूण कार्यस्थळ परिणामकारता यांसारख्या सॉफ्ट स्किल्सना अधिक महत्त्व दिले जात आहे. मानसिकतेमधील या परिवर्तनामुळे जाणकार असण्यासोबत उद्योगाच्या गतीशील मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चपळ व स्थिर असलेल्या कर्मचारीवर्गाची निर्मिती होत आहे.
सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ७६ टक्के नियोक्ते आता एण्ट्री-लेव्हल हायरिंगसंदर्भात शैक्षणिक क्रेडेन्शियल्सपेक्षा कौशल्यांना प्राधान्य देतात. ते व्यावहारिक क्षमता आणि कामाच्या ठिकाणी काम करण्यास सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत.
इनडीड इंडियाचे विक्री प्रमुख सशी कुमार म्हणाले की नवीन कामकाज पद्धतींचा अवलंब करण्यामध्ये निपुण असलेली ही मेट्रो क्षेत्रे आता कौशल्य-आधारित रिक्रूटमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. भारतातील कर्मचारीवर्गामध्ये मोठी क्षमता आहे, जे सर्वसमावेशक रोजगार बाजारपेठेतील वाढ व नाविन्यतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहे. उद्योग अधिक गतीशील झाले असल्यामुळे त्वरित शिकण्याची क्षमता आणि परिवर्तन घडवून आणण्याची कौशल्ये महत्त्वाची बनली आहेत. रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये असल्यास एण्ट्री-लेव्हल उमेदवारांना रोजगार मिळू शकतात आणि ते त्वरित योगदान देण्यास सुरूवात करू शकतात.
अहवालामधून गेल्या तिमाहीच्या (जानेवारी ते मार्च २०२४) तुलनेत या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२४) एण्ट्री-लेव्हल नियुक्तीमध्ये एकूण ७.५ टक्के वाढ निदर्शनास येते. बेंगळुरू १२.५ टक्के वाढीच्या अंदाजासह अग्रस्थानी आहे, ज्यानंतर १० टक्क्यांसह मुंबई आणि ९ टक्क्यांसह चेन्नई यांचा क्रमांक आहे. इतर शहरे आहेत अहमदाबाद (८.५ टक्के), पुणे (७.५ टक्के), हैदराबाद (७.५ टक्के), चंदिगड (६ टक्के), दिल्ली (५.५ टक्के) आणि कोलकाता (१ टक्के).
“आयटी हब्स म्हणून प्रसिद्ध असलेली बेंगळुरू, मुंबई व चेन्नई यांसारखी मेट्रो शहरे जीसीसी आणि आयटी कंपन्यांसह अनेक नवीन पदवीधरांचे लक्ष वेधून घेतात. यात प्रामुख्याने बीपीओ कस्टमर सर्विस, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, डिलिव्हरी सर्विसेस्, मॅन्युफॅक्चुरिंग, आयटी सर्विसेस्, बीएफएसआय, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक्स इ. क्षेत्रांचा समावेश आहे.
