Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसी संघटना आक्रमक; धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरला

जालना:  लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या इतर मागासवर्गीय नेत्यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे तर ओबीसी संघटना आक्रमक झाले आहेत. त्यांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवून धरला असून शासनाकडून उपोषणाची दखल घेतली जात नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहील असा इशारा दिला आहे. 

एकीकडे मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले असले तरीही दुसरीकडे याच गावाच्या वेशीवर ओबीसी नेत्यांनी आरक्षण बचाव या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनादरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनलेली असूनही शासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही, असा ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे. हाके आणि वाघमारे यांची प्रकृती खालावल्याने संतप्त झालेल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.

 पिवळ्या रंगाचे झेंडे घेऊन आंदोलन रस्त्यावर उतरले असून ‘एक पर्व ओबीसी सर्व, ‘ अशा घोषणा दिल्या जात आहेत. जोपर्यंत शासनाचे शिष्टमंडळ उपोषण स्थळी भेट देऊन आमच्या भावना समजून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

उपोषणकर्त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. आज तर त्यांचा श्वासही काही काळासाठी थांबला होता  आमच्या संघर्षयोद्ध्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी उभा महाराष्ट्र पेटविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading