महिला सुरक्षा रक्षकाने लगावली कंगना रनौतच्या कानशिलात
नवी दिल्ली : भाजपची नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतला कानशिलात लगावल्याची घटना घडली. चंदीगडच्या विमानतळावर ही घटना घडली असून सुरक्षा रिक्षाने तिच्या कानशिलात लगावल्याचा आरोप कंगनाने केला आहे. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ फिरत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना भाजपकडून लढली होती आणि जिंकूनही आली. त्यांनतर ती दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी चंदीगडवरून निघाली होती. यावेळी हा प्रकार घडल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहिती नुसार, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेतून जिंकल्यानंतर कंगना रणौत ही चंदीगडमध्ये तिच्या आईची भेट घेऊन दिल्लीला भाजपच्या बैठकीसाठी निघाली होती. यावेळी चंदीगड विमानतळावर सुरक्षा रक्षकांशी तिचा वाद झाला. यावेळी कंगनाला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. दरम्यान, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा सर्व प्रकार घडल्यानंतर कंगना दिल्लीमध्येदेखल पोहचली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत.
चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाने दिल्लीमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात केलेल्या विधानावर नाराज होती. त्याच रागात कौरने कंगनावर हात उचलल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, महिला सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
