fbpx
Monday, May 20, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

त्यांनी तर 11 वर्षांतच चव्हाण साहेबांना सोडलं. मी 35 वर्ष साथ दिली – अजित पवारांचा साहेबांना टोला

घोडेगाव : शरद पवार यांची तब्बेत बरी नसतानाही वयाच्या 84 वर्षी देखील आपल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सध्या ते विश्रांती घेत आहेत. यावर अप्रत्यक्ष भाष्य करीत अजित पवार म्हणाले, “लोक स्वार्थी असतात. जोवर आमचे हात पाय चालू आहेत. तोवर तुम्ही आम्हाला प्रचाराला बोलवणार नंतर नाही. मागे एकदा पवार साहेबांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं; तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही उपचार करून घ्या बाकी सगळं मी बघतो. फक्त शेवटच्या सभेला तुम्ही या. पण आता तसं उमेदवार करत नाही.

शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी घोडेगाव, ता. आंबेगाव येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, प्रत्येक उमेदवाराला कोणी ना कोणी संधी देत असतात. आम्हाला पवार साहेबांनी संधी दिली. तर पवार साहेबांना 1967 साली यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली. त्यामुळेच ते आपले कर्तुत्व दाखवू शकले. त्यानंतर 1978 साली पवार साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं. हा इतिहास सांगतो. मग लोकं मला विचारतात ‘तुम्ही पवार साहेबांना या वयात सोडायला नको होत’, मग त्यांनी काय केलं? त्यांनी तर 11 वर्षांतच चव्हाण साहेबांना सोडलं. मी  तर 35 वर्ष साथ दिली आहे. साहेबांना आम्ही कितीदा सांगितलं की आता करतो आम्ही. पण त्यांनी आम्हाला नेहमी सांगितलं की मी सांगतो तसंच कर. मी चांगल करत नव्हतो का? आज आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो म्हणून या भागात अनेक विकास कामे होवू शकली. नसतो तर एक रुपायांचाही निधी मिळाला नसतं. सगळी सोंग करता येतात पण पैशाच करता येत नाही.

पुढे बोलताना पवार म्हणाले, विरोधक आता जे बोलबच्चन करतात त्यांना आम्हीच शोधून आणलं. मध्यंतरी ते राजीनामा देणार होते. पण मी त्यांना थांबवल. त्यामुळे ते आदिवासी भागात फिरकले नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिलं. अन् लगेच त्यांनी महात्मा गांधीच्या मारेकऱ्यांची नथूराम गोडसेची भूमिका केली. हा का स्वाभिमान? पैश्यांसाठी तुम्ही काय पण करतात. असा टोला पवार यांनी कोल्हेना लगावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading