fbpx
Wednesday, June 26, 2024
BusinessLatest News

प्राथमिक समभाग विक्रीसाठी नॉर्दर्न आर्क कॅपिटल लिमिटेडतर्फे सेबी कडे डीआरएचपी सादर

वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म नॉर्दर्न आर्क कॅपिटल लिमिटेडने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस बाजार नियामक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे दाखल केला आहे.

कंपनीची प्राथमिक समभाग विक्रीद्वारे 500  कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि 21,052,629 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“विक्रीची ऑफर”) असलेले ऑफर फॉर सेल समाविष्ट असलेल्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरद्वारे निधी उभारण्याची योजना आहे.

नॉर्दर्न आर्क हा एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म असून प्रामुख्याने भारतातील सेवा वंचित असलेल्या कुटुंबांच्या आणि व्यवसायांच्या विविध किरकोळ क्रेडिट आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. नॉर्दर्न आर्कने भारतातील सर्व केंद्रित क्षेत्रांमध्ये क्रेडिट सक्षम करण्यासाठी एक डोमेन कौशल्य विकसित केले आहे. यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (“MSMEs”) वित्तपुरवठा, मायक्रोफायनान्स (“MFI”), ग्राहक वित्त, वाहन वित्त, वाजवी गृहनिर्माण वित्तपुरवठा आणि कृषी वित्त यांचा समावेश आहे. नॉर्दर्न आर्क MSME, MFI आणि ग्राहक वित्त क्षेत्रात अनुक्रमे 13 वर्षे, 14 वर्षे आणि आठ वर्षांपासून कार्यरत आहे.

एकूण 21,052,629 इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये लीपफ्रॉग फायनान्शियल इन्क्लुजन इंडिया (II) लिमिटेड द्वारे एकूण 4,922,949 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अॅसीऑन आफ्रिका – आशिया इन्व्हेस्टमेंट कंपनी द्वारे 1,265,476 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ऑगस्टा इन्व्हेस्टमेंट II Pte लिमिटेड द्वारे 4,254,744 पर्यंत एकत्रित केलेले इक्विटी शेअर्स; एट रोडस इन्व्हेस्टमेंट मॉरीशीयस II लिमिटेड (पूर्वी FIL Capital Investments (Mauritius) II Limited म्हणून ओळखले जाणारे) द्वारे 2,237,030 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; दावरा ट्रस्ट द्वारे 1,631,949 पर्यंत एकत्रित केलेले इक्विटी शेअर्स (दावरा होल्डीग्ज या त्यांच्या कॉर्पोरेट विश्वस्त म्हणून प्रतिनिधित्व असलेले (पूर्वी दावरा होल्डीग्ज प्रायव्हेट लिमिटेड आणि दावरा ट्रस्टशिप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे); 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड (पूर्वी आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड म्हणून ओळखले जाणारे) द्वारे 5,000,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स; 360 ONE स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सिरीज 2 द्वारे 107,696 पर्यंत इक्विटी शेअर्स (पूर्वी IIFL स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सिरीज 2 म्हणून ओळखले जाणारे); 360 ONE स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज 3 द्वारे 47,373 पर्यंत इक्विटी शेअर्स (पूर्वी IIFL स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड-सिरीज 3 म्हणून ओळखले जायचे); 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज 4 द्वारे द्वारे 162,817 पर्यंत इक्विटी शेअर्स – (आधी आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड म्हणून ओळखले जाणारे); 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सीरीज 5 द्वारे 133,595 पर्यंतचे इक्विटी शेअर्स – (पूर्वी आयआयएफएल  स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड-सिरीज 5 म्हणून ओळखले जात होते); 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज 6 (पूर्वी आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज 6 म्हणून ओळखले जाणारे) द्वारे 5,481 पर्यंतचे इक्विटी समभाग; 360 वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड- सिरीज 7 द्वारे 132,299 पर्यंत इक्विटी शेअर्स – (पूर्वी IIFL स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड सिरीज 7 म्हणून  ओळखले जाणारे); सुमितोमो मित्सुई बँकिंग द्वारे 1,151,220 पर्यंत एकत्रित केलेले इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “विक्री भागधारक” म्हणून संबोधले जाते आणि प्रत्येक वैयक्तिकरित्या, “विक्री भागधारक” म्हणून आणि विक्री करणाऱ्या भागधारकांद्वारे इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर फॉर सेल) यांचा समावेश आहे.

पुढे कर्ज देण्याच्या दिशेने नॉर्दर्न आर्क कॅपिटल लिमिटेडचा भविष्यातील भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading