विश्वेश्वर बँकेच्यावतीने बँकेशी संबंधित कार सेवकांचा सत्कार
पुणे : विश्वेश्वर सहकारी बँकेच्यावतीने अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापन दिनच्या निमित्ताने बँकेशी संबंधित कारसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी ६ डिसेंबर, १९९२ रोजी कारसेवेत सहभागी झालेले बँकेचे माजी संचालक व तत्कालीन पुणे बजरंग दलाचे अध्यक्ष शरद गंजीवाले तसेच सेवक संतोष ओमले, ज्ञानेश्वर शेंडे या विश्वेश्वर बँक परिवारातील कारसेवकांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेची आरती, पूजन त्यानंतर शरद गंजीवाले यांनी कारसेवेवेळी अयोध्येमध्ये असलेली परिस्थिती, आलेले अनुभव व ओढवलेले प्रसंग यांचे वर्णन करून आठवणी जागवल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विधीज्ञ एस. के. जैन, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, बँकेचे माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप मेहता, जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा, बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष श्रेयस रुकारी, मनोज साखरे, राजेंद्र मिरजे, दत्तात्रय कामठे, रवींद्र महाजन, सुभाष लहगे, चिंतामणी वैजापूरकर, रत्नाताई कसबेकर, व्यवस्थापन मंडळ सदस्य चंद्रशेखर जोशी, सुनिल फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राम रक्षा पठणाने झाली, उपस्थितांनी यावेळी दिवे प्रज्वलित करीत दिवाळी साजरी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संत साहित्याचे गाढे अभ्यासक विद्याधर ताठे यांनी केले.
