शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना – राहुल नार्वेकरांचा निकाल
महाराष्ट्राच्या सत्तांतराचा निकाल; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बादलावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्या नंतर आमदार पात्र किंवा अपात्र आहेत, हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज सुनावला. घटनेतील 10 व्या सूचीनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे. असे सांगत नांर्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देत. एकनाथ शिंदे यांच्याच गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार पात्र ठरले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
निकाल देताना नार्वेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे विधानसभेत उलट तपासणीला आले नाहीत, म्हणून ठाकरे गटाचं प्रतित्रज्ञापत्र आम्ही अमान्य केले आहे. तसेच 10 व्या सूचीनुसार मी फक्त राजकीय नेतृत्व कोणते कायदेशीर याचाच शोध घेतला. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची?, अधिकृत व्हीप कुणाचा?, बुहमत कुणाचं हे ठरवायचं होतं. उद्धव ठाकरे गट ज्या पक्षाच्या घटने विषयी वारंवार सांगत होता. ती 2018 ची शिवसेना पक्षाची घटना ग्राह्य धरली जाणार नाही, कारण निवडणूक आयोगाकडे त्याची नोंद नाही.
त्यामुळे पक्ष प्रमुखाला थेट कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेता येतो. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे गटाचा भरत गोगावले यांचा व्हीप हा कायदेशीर मानत मनात ४० पैकी १६ आमदार पात्र ठरवले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा खरा शिवसेना पक्ष असल्याचे सांगितले आहे.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले …..
- शिंदे गटाच्या आमदारांनी पक्ष विरोधी कृत्य केलेले नाही
- सुनील प्रभू यांना व्हीप जारी करण्याचा कोणताही आधीकार नाही.
- प्रभूनां बैठक बोलावण्याचा आधीकार नाही
- बैठकीला आलेले नाही म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत.
- शिंदे गटाच्या भरत गोंगावलेंचा व्हीप वैध
- शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेची निवडणूक आयोगात नोंद नाही.
- पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना कोणालाही त्यांच्या पदावरून काढता येत नाही.
- पक्षातील नेते मिळून आपक्षा नेता निवडू शकतात.
