Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

ख्रिस्ती समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे -बिशप थॉमस डाबरे

पुणे : ख्रिस्ती समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रश्न मांडण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व मिळायला हवे असे मत बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले .ख्रिस्ती समाजाच्या संविधानिक ,सामाजिक, राजकीय हक्कांच्या संदर्भात व ध्येय धोरणे ठरवण्यासाठी ख्रिश्चन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते .पुढे ते म्हणाले की , समाजाला प्रतिनिधित्व नाही याबाबत खंत व्यक्त केली व प्रशांत केदारी याना आमदारकी दयावी असे प्रतिपादन केले व ते योग्य उमेदवार आहेत असे निक्षून सांगितले. बिशप अँड्रू राठोड यांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले व परिषदेला शुभेच्छा दिल्या.

आपल्या मनोगतामध्ये प्रशांत केदारी यांनी आपली चळवळ ख्रिश्चनांची हक्क अधिकार मिळविण्यासाठी असून ती संविधानावर आधारित आहे,बहुजन समाज,दलित समाज,अल्पसंख्यांक अशा सर्व जातीधर्माच्या लोंकांबार्बर आपण काम करीत राहू असे सांगितले ,राजकीय प्रतिनिधीत्वामध्ये ख्रिश्चनांना संधी मिळावी,अँग्लो इंडीयन खासदारकी,विधानसभा सर सकट ख्रिस्ती बांधवाना द्यावे,मदार तेरेसा यांचं नावाने महामंडळ मिळावे,व अल्पसंख्यांक बजेट मध्ये वृद्धी करावी असे प्रतिपादन केले. कुठल्याही पक्षाने ख्रिश्चन समाजाला गृहीत धरू नये,येणाऱ्या निवडणुकांमध्ये समाज भूमिका घेईल असे स्पष्ट केले.ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा आजून तीव्र करण्यात येईल असे सांगितले.

परिषदेला विजय बारसे ,माजी पोलीस महासंचालक अब्दूर रहमान ,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड ,रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डांबले ,जमत ए इस्लाम चे झुबेर मेमन ,ख्रिश्चन फोरम चे राजेश केळकर,फा. जो गायकवाड ,संजय गायकवाड,सिस्टर आरकेंजळ,युक्रांदचे संदीप बर्वे,ऍड.असुंत पारगे,स्टीव्हन गोडे,निशिकांत चांदेकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,आम आदमी पक्षाचे विजय कुंभार, सुदर्शन जगदाळे, रेन्झील युथ चे सुधीर हिवाळे, पास्टर डॅनियल, सुधाकर सदाफळ, मार्कस पंडित, प्रमोद पारधे, जॉन फेर्नांडिस, फेबियन सॅमसन, मेरी पारगे,आलीस लोबो, सलामी तोरणे ,अल्फान्सो रेफेन्स ,सचिव आंतोन कदम,जॉन मानतोडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजाचे नेते विजय बारसे यांनी केलेल्या कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला,स्टेला गोडे यांचा शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

IPS रहमान यांनी ख्रिश्चनांनी शिक्षण,आरोग्य,सामाजिक कामात देशासाठी मोठे योगदान दिले आहे ,मुस्लिम व ख्रिस्ती बांधवानी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले,पोप फ्रान्सिस यांनी पॅलेस्टाईन च्या बाबतीत शांततेचे आवाहन केले ही खूप मोठी बाब आहे असे सांगितले प्रशांत केदारी यांच्या चळवळीला मुस्लिम समाजाचा संपूर्ण पाठिंबा राहील असे सांगितले,प्रवीण गायकवाड यांनी ख्रिश्चन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे यासाठी सध्याचे राजकारण समजून घ्यावे लागेल व त्यासाठी मोर्चे बांधणी गरजेची आहे.राहुल गायकवाड यांनी दलीत समाजाने रस्त्यावर उतरून हक्काची लढाई जिंकली त्याच प्रमाणे प्रशांत केदारी यांनी चळवळ उभी केली आहे असे सांगितले,नॅशनल कॉफरन्स फॉर मायनॉरीटीला बिशप थॉमस डाबरे आणि बिशप अनिल कुटो यांनी खूप मदत केली असे आवर्जून सांगितले. बाबा खरात म्हणाले चळवळ ही सातत्याने चालू राहिली पाहिजे ,आवाहने स्वीकारून पुढे चालले पाहिजे असे ते म्हणाले ,फादर जो गायकवाड यांनी प्रार्थना करून परिषदेला शुभेछया दिल्या. परिषदेत ठरावाचे वाचन ऍड.आंतोन कदम यांनी केले ,संविधान वाचन प्रतिमा केदारी यांनी केले.सूत्रसंचालन जॉन मानतोडे व अर्चना बोर्डे यांनी केले.मार्कस पंडित यांनी आभार मांडले.राष्ट्रगीताने परिषदेची सांगता झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading