Thursday, September 3, 2026
BusinessLatest News

भारतातील वाहतुकीच्या वेळेत एका दिवसाच्या सुधारणेसह FedEx तर्फे नवीन व्हिएतनाम सेवा सादर

मुंबई : FedEx Corp. (NYSE: FDX)  ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक FedEx Express (FedEx) जलद वाहतूक सेवा देणारी नवीन उड्डाण सेवा सादर करत व्हिएतनाम आणि भारत यांच्यातील आंतरखंडीय सेवा अधिक उंचावत आहे.

३१ ऑक्टोबर २०२३ पासून हे लागू होत आहे. नवीन उड्डाण सेवा व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी येथून आठवड्यातून चार वेळा संध्याकाळी उड्डाण करणारे समर्पित B767 मालवाहू विमान वापरेल. त्यामुळे भारतातील आयातदारांसाठी वाहतुकीच्या वेळेत एका व्यावसायिक दिवसाची सुधारणा होईल. हो ची मिन्ह सिटी येथून आता एकूण नऊ साप्ताहिक उड्डाणे निघत असून, आता भारतात शिपमेंट दोन व्यावसायिक दिवसांत पोहोचेल*.

FedEx च्या या प्रगतीमुळे भारतातील व्यवसायांना वाढते उत्पादन केंद्र असलेल्या व्हिएतनामच्या उद्योगक्षेत्राकडून लाभ घेण्यास मदत मिळेल. सध्या, भारत हा व्हिएतनामच्या प्रमुख आठ व्यापारी भागीदारांपैकी एक आहे आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारात गेल्या काही वर्षांत स्थिर वाढ दिसून आली आहे. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या आर्थिक वर्षातील भारतीय आकडेवारीनुसार, द्विपक्षीय व्यापार २०२१-२२ च्या तुलनेत वार्षिक ४% ने वाढला आणि १४.७० अब्ज अमेरिकी डॉलर[1]. पर्यंत पोहोचला!

FedEx Express च्या मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका हवाई नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “भारत-व्हिएतनाम यांच्यामध्ये विकसीत होत असलेले संबंध दोन्ही देशांमधील व्यवसायांसाठी नवीन वाढीच्या संधी खुल्या करण्याचे आश्वासन देत आहेत. त्यामुळे व्यापार आणि आर्थिक विस्तार वाढत आहे. वाहतुकीच्या वेळेत झालेली सुधारणा भारतातील आयातदारांना व्हिएतनाममधील व्यवसायांसोबत जलद आणि अधिक कार्यक्षम पुरवठा साखळी नेटवर्क तयार करण्यात मदत करून कार्यक्षम लाभ मिळवून देऊ शकते. यामुळे व्यापार सुलभ होत दोन्ही देशांमधील व्यवसायांना आणि विशेषत: एसएमईजच्या वाढीस चालना मिळते.”

FedEx १९८४ पासून भारतातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला पाठबळ देत आहे. नवीन उड्डाण सेवेमुळे, भारतातील व्यवसायांना जलद वितरण वेळेसह चांगली कार्यक्षमता मिळू शकेल. या नवीन घोषणेतून देशातील सेवा सुधारण्यासाठी आणि कामकाज मजबूत करण्यासाठी असलेली कंपनीची बांधिलकी दिसून येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading