Friday, September 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं “प्रपोज” हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला …

रमा राघव मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री श्रद्धा पवारचं “प्रपोज” हे गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे, या गाण्यात श्रद्धा आणि आदित्य यांच्यामद्धे हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून शब्द रोहन साखरे यांचे आहेत तर केवल वाळुंज आणि सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून रसिकांना अनुभवता येत आहे. गाण्याचं चित्रिकरण नाशिक येथे निसर्गरम्य ठिकाणी झालं असून त्याच छायांकन सुरज मोरे यांनी केल आहे तर दिग्दर्शन मनीष महाजन यांनी केलं आहे, श्रद्धाची यापूर्वी प्रदर्शित झालेली गाणी रसिकांमद्धे प्रचंड लोकप्रिय असून तिचं “माझी बायगो” हे गीत जवळपास दीडशे मिलियन व्हीवच्या घरात पोहोचलं आहे.

गाण्याबद्दल श्रद्धा म्हणते कि “जेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शन मनीष यांनी मला हे गाणं ऐकवलं त्याक्षणी मी गाण्याच्या प्रेमात पडले. मी या गाण्यासाठी लगेच होकार दिला. गाण्यातील लोकेशन्स डोळ्यांचं पारणं फिटवणारे आहेत, तसेच टिम फार कमाल होती त्यामुळे या गाणं चित्रित करताना खूप धमाल आली, आजवर माझ्या गाण्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे तसाच या गाण्याला देखील नक्कीच देतील अशी खात्री आहे, तसेच सीरिअल च्या शूटिंग च्या व्यस्त वेळापत्रकामुळे खूप वर्षांनी गाणं करता आलं त्यामुळे गाण्याबद्दल प्रचंड उत्सुकता देखील आहे.”

या गाण्याचे दिग्दर्शक ‘मनीष महाजन’ गाण्याविषयी सांगतात, “प्रपोज हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचं चित्रीकरण आम्ही नाशिक येथे केलं आहे. आम्ही चित्रीकरणाचे लोकेशन्स शोधले आणि ते अतिशय निसर्गरम्य होते. आम्ही जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून या गाण्यावर काम करतोय, रसिकांनी ते नक्कीच आवडेल अशी आशा वाटते”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading