होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने लाँच केली नवी XL750 Transalp
नवी दिल्ली – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज आपली नवी, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेलेली अॅडव्हेंचर टुअरर ‘XL750 Transalp’ १०‚९९‚९९० रुपयांच्या (एक्स शोरूम गुरुग्राम) प्रारंभिक किंमतीत लाँच केली. याआधीच्या मोटरसायकलचा वारसा पुढे नेणारी होंडा XL750 Transalp सर्व प्रकारच्या प्रवासासाठी सर्वोत्तम आहे, मग तो प्रवास गर्दीच्या वेळेचा असो किंवा टुरिंग ट्रिपचा असो, आडवाटांचा असो नाहीतर हिमालयातला. ही गाडी भारतात जपानमधून सीबीयू (कम्पलीटली बिल्ट अप) मार्गाने आणली जाणार असून प्रीमियम बिगविंग टॉप लाइन वितरकांच्या माध्यमातून तिची विक्री केली जाईल.
होंडाची अद्ययावत, प्रीमियम अडव्हेंचर मोटरसायकल सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘नवी ‘XL750 Transalp’ भारतात लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. अॅडव्हेंचर मोटरसायकल विभाग वेगाने विस्तारत असून ग्राहक मोटरसायकलवर स्वार होऊन नव्या वाटा धुंडाळण्यासाठी उत्सुक आहेत. होंडा XL750 Transalp जगभरातील साहसप्रेमींमध्ये लोकप्रिय असून आम्हाला खात्री आहे, भारतातील अॅडव्हेंचर मोटरसायकल ग्राहकांना ती आकर्षित करेल.’
नव्या XL750 Transalp च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘गो एनीव्हेयर स्पिरीटचे प्रतीक असलेली XL750 Transalp साहस नव्या रूपात सादर करत आहे. अशाप्रकारची खऱ्या अर्थाने अॅडव्हेंचर बाइक भारतात सादर करताना एचएमएसआयला आनंद होत आहे. XL750 Transalp चे बुकिंग आमच्या एक्सक्लुसिव्ह बिगविंग टॉप लाइन डीलरशीप्सकडे खुले झाले असून त्याचे वितरण पुढील महिन्यापासून सुरू होईल. स्वप्नपूर्तीचा आनंद देणारी एचएमएसआय यापुढेही ग्राहकांसाठी नव्या XL750 Transalp सह अशाचप्रकारे कौशल्यांचा विकास करत राहील आणि अॅडव्हेंचर ट्राइब समृद्ध करेल.’
स्टायलिंग आणि इक्विपमेंट
होंडाची नवी XL750 Transalp १९८० मध्ये आलेल्या मूळ Transalp चा वारसा पुढे नेणारी आहे. त्याच्या डिझाइनमध्ये साहसी भावनेचा समावेश करण्यात आला आहे, जो गाडी चालवताना खुलून येतो. अभिजात स्टायलिंग आणि अँग्युलर डिझाइनमुळे ही मोटरसायकल सर्वगुणसंपन्न झाली असून जगभरातीस साहसप्रेमींना ती पसंत पडली आहे.
XL750 Transalp सर्वसमावेशक पद्धतीने तयार करण्यात आली आहे. तिचे आटोपशीर हेडलाइट, इंटिग्रेटेड विंडस्क्रीन आणि मोठा टँक बिनधास्त अभिव्यक्ती आणि एयरोडायनॅमिक कामगिरी यांचा समतोल साधणारी आहे. टफ रियर डिझाइन अॅडव्हेंचर स्टाइलसाठी योग्य असून त्याला अॅल्युमिनियम आणि एलईडी लायटिंग यंत्रणेची जोड देण्यात आली आहे.
होंडाच्या अद्ययावत, अॅडव्हेंचर टुरिंग बाइकमध्ये ५.० इंच टीएफटी पॅनेलचा समावेश करण्यात आला आहे, जो सर्व प्रकारची माहिती दर्शवतो. त्यात स्पीडोमीटर, टेकोमीटर, गियर पोझिशन इंडिकेटर, फ्युएल गॉज आणि त्याचा वापर, रायडिंग मोड्स, इंजिन पॅरामीटर्स व इतर विविध गोष्टींचा समावेश आहे. हा डिस्प्ले कस्टमायझेबल असल्यामुळे रायडरच्या पसंतीनुसार बदलता येतो व त्याचे व्यवस्थापन स्क्रीन किंवा डाव्या हँडलबारवर असलेल्या स्विचगियरच्या मदतीने करता येते.
या एडीव्हीमध्ये होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टीमचा (एचएसव्हीसीज) समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे रायडरला प्रवासादरम्यान आपला स्मार्टफोन लिंक करून कॉल्स, मेसेजेस, संगीत आणि नॅव्हिगेशन इत्यादी गोष्टींचे व्हॉइस मॅनेजमेंट करता येते. त्याशिवाय यात असलेली इमरजन्सी स्टॉप सिग्नल सुविधा हजार्ड लॅम्प फ्लॅश करून मागे असलेल्या वाहनाला अचानक ब्रेक दाबले जात असल्याची सूचना देते. त्याशिवाय यात ऑटोमॅटिक टर्न सिग्नल कॅन्सलिंग सुविधाही देण्यात आली आहे.
इंजिन आणि कामगिरी
XL750 Transalp ची चौफेर क्षमता कंपनीच्या नव्या ७५ सीसी लिक्विड- कुल्ड 270 क्रँक इन- लाइन टु- सिलेंडर इंजिनपासून आलेली आहे. त्यामध्ये होंडाच्या जपानी इंजिनियरिंग कौशल्य छोट्या स्वरुपात देण्यात आले असून ते लक्षणीय टॉप एंड पंच कमी ते मध्यम आरपीएममध्ये भरपूर टॉर्कसह देते. ही मोटर ६७.५ केडब्ल्यू उर्जा आणि ७५ एनएमचा टॉर्क ६ स्पीड गियरबॉक्ससह देते.
दमदार पिक- अप आणि थ्रॉटलचा प्रतिसाद यांसाठी XL750 Transalp चे पेटंटेड व्हॉर्टेक्स फ्लो डक्ट साइड स्कूप्समधून एयरबॉक्समध्ये समान वितरण करते व त्यानंतर ते डाउनड्राफ्ट इनटेक्स आणि ४६ एमएम व्यासाच्या थ्रॉटल बॉडीजमध्ये जाते. सिलेंडरमध्ये CRF450R आणि CBR1000RR-R फायरब्लेडप्रमाणे एनआय- एसआयसी (निकेल- सिलिकॉन कार्बाइड) कोटिंग वापरण्यात आले आहे, जे इंजिनची कार्यक्षमता वाढवते.
थ्रॉटल-बाय-वायर (टीबीडब्ल्यू) यंत्रणेतून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक एड्समुळे रायडरला त्याच्या आवडीनुसार ५ रायडिंगमधून निवड करता येते. त्यामध्ये इंजिनची ताकद, इंजिन ब्रेकिंग आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) आणि एबीएस आणि असिस्ट स्लिपर क्लच यांचे वेगवेगळ्या प्रकारे मिश्रण साधण्यात आले आहे. वेगवेगळ्या रायडिंग मोड्समध्ये स्पोर्ट, स्टँडर्ड, रेन, ग्रॅवेल आणि युजर यांचा समावेश असून ते आवडीनुसार अडजस्ट करता येतात.
सस्पेन्शन, ब्रेक्स आणि टायर्स
स्थैर्य आणि वाट काढण्याची क्षमता यांच्यात योग्य समतोल साधणाऱ्या XL750 Transalp ची हलक्या वजनाची स्टील डायमंड फ्रेम दैनंदिन प्रवासातली हाताळणी सोपी करते आणि लांब पल्ल्याच्या हायवेवर आराम तसेच अनोळखी प्रदेशात टिकाव धरण्याचा विश्वास देते. १८ इंची रियर व्हीलला जोडण्यात आलेले २१ इंची फ्रंट व्हील आणि स्पोक रस्त्यावर तसेच रस्त्यापलीकडे वैविध्य देते.
रस्त्यावरच्या दमदार कामगिरीसाठी आणि ऑफ- रोडवरील धक्के बसून न देण्यासाठी या अडव्हेंचर टुअररमध्ये शोवा ४३ एमएम एसएफएफ- सी अपसाइड- डाउन (युएसडी) फ्रंट फोर्क्स देण्यात आले आहेत आणि रियर शॉक ऑपरेटिंग प्रो- लिंकमधून केले जाते. ब्रेकिंग ड्युटीजची जबाबदारी ड्युएल ३१० एमएम वेव डिस्कवर हायड्रॉलिक २- पिस्टन कॅलिपर्स पुढच्या बाजूस आणि २५६ एमएम सिंगल डिस्क १ पॉट कॅलिपरसह मागील बाजूस ड्युएल चॅनेल एबीएससह देण्यात आले आहे.
रंग, किंमत आणि उपलब्धता
नव्या होंडा XL750 Transalp ची किंमत रू. १०‚९९‚९९० (एक्स शोरूम गुरुग्राम आणि प्रारंभिक) ठेवण्यात आली आहे. ही गाडी रोज व्हाइट आणि मॅट बलिस्टिक ब्लॅक अशा दोन रंगांत उपलब्ध असून ते गाडीच्या साहसी रूपाला साजेसे आहेत. एचएमएसआयच्या एक्सक्लुसिव्ह बिगविंग टॉपलाइन वितरकांकडे पहिल्या १०० ग्राहकांसाठी बुकिंग खुले करण्यात आले आहे. त्यात गुरुग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बेंगळुरू (कर्नाटक), इंदौर (मध्य प्रदेश), कोची (केरळ), हैद्राबाद (तेलंगणा), चेन्नई (तमिळनाडू) आणि कोलकाता (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. वितरण नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होईल.
| नवी होंडा XL750 Transalp | |
| रंग | रोज व्हाइट आणि मॅट बलिस्टिक ब्लॅक |
| प्रारंभिक किंमत (एक्स शोरूम गुरुग्राम) | रू. १०‚९९‚९९० |
