एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेद्वारे विलीनीकरण जाहिर
विलीनीकरणाचा अटी
एयु एसएफ़बीचा आणि फ़िनकेअर एसएफ़बी चा संचालक मंडळाद्वारे अनुक्रमे एकमेकांचा व्यवसायातील कार्यकारी पैलूंचा आणि परिणामांचा योग्य तो विचार केला आहे. अटींनुसार फ़िनकेअर एसएफ़बी चे प्रवर्तक असलेल्या फ़िनकेअर बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड द्वारे विलीनीकरण होण्यापुर्वी भारतीय चलनानुसार ७०० कोटी रूपये फ़िनकेअर एसएफ़बी ला देऊ करतील.
वॅल्युअर्स एलएलपीचे बन्सी एस.मेहता आणि आरबीएसए व्हॅल्युएशन ॲडवायझर एलेलपीमधील, स्वतंत्र व्हॅल्युअर अनुक्रमे एयु एसएफ़बी आणि फ़िनकेअर एसएफ़बी द्वारे नेमण्यात आले असून, त्यांचा शिफ़ारसीनुसार शेअर एक्सचेंज रेशो ठरविण्यात आला आहे ज्याकरिताची मान्यता ही प्रत्येक संचालक मंडळाद्वारे देण्यात आलेली आहे. शेअर एक्सचेंज रेशोकरिता जेएम फ़ायनान्शीयल लिमिटेडने एयु एसएफ़बी ला फ़ेअरनेस मत दिले तर फ़िनकेअर एसएफ़बी ला फ़ेअरनेस मत हे आयआयएफ़एल सिक्युरिटीज लिमिटेडद्वारे देण्यात आले.
त्यानुसार, फ़िनकेअर एसएफ़बी चा भागधारकांना फ़िनकेअर एसएफ़बीचा २,००० शेअर्सचा तुलनेत एयु एसएफ़बी चे ५७९ शेअर्स उपलब्ध होतील. विलीनीकरणानंतर अस्तित्वात असलेल्या फ़िनकेअर एसएफ़बी चा भागधारकांची ९.९ टक्य्यांची भागीदारी एयु एसएफ़बी मध्ये असेल.
आयसीआयसीआय सिक्युरीटीज लिमिटेड आणि अर्पवुड कॅपिटल प्रायवेट लिमिटेड हे व्यवहाराकरिता फ़िनकेअर एसएफ़बी चे आर्थिक सल्लागार होते तर अम्बित प्रायवेट लिमिटेड आणि मिरई असेट कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायवेट लिमिटेड हे एयु एसएफ़बी करिता आर्थिक सल्लागार होते. एझेडबी ॲन्ड पार्टनर्स हे एयु एसएफ़बी चे कायदेशीर सल्लागार होते तर अनग्राम पार्टनर्स हे फ़िनकेअर एसएफ़बी चे कायदेशीर सल्लागार होते. के पीएमजी आणि पीडब्ल्यूसी हे अनुक्रमे एयु एसएफ़बी आणि फ़िनकेअर एसएफ़बी करिता परिश्रम सल्लागार होते.
राजीव यादव, एम.डी आणि सीईओ फ़िनकेअर एसएफ़बी यांना विलीनीकरणानंतर एयु एसएफ़बी चे डेप्युटी सीईओ म्हणून नेमले जाईल. ते एयु एसएफ़बी चे एम.डी आणि सीईओ संजय अगरवाल यांना रिपोर्ट करतील. यादव हे एयु एसएफ़बी च्या फ़िनकेअर युनिटचे काम बघतली, ज्यामध्ये फ़िनकेअर एसएफ़बी चा जवळ जवळ सगळ्याच व्यवहारांचे काम बघितले जाईल. याशिवाय ते एकत्रितपणे एयु च्या एम.डी आणि सीईओंसह एयु एसएफ़बी चा आयटी आणि डिजिटल युनिटचे देखील काम बघतील, ज्यामुळे विलीनीकरणानंतर सहजतेने आयटी व्यवहार होऊ शकतील. आपली नवी भूमिका पार पाडते वेळी, यादव यांना एयु एसएफ़बी चा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये देखील बोलविले जाईल. दिव्य सेहगल, फ़िनकेअर चे नामांकित संचालक हे एयु एसएफ़बी चा संचालक मंडळामध्ये सामील होतील ज्यामुळे विलीनीकरणानंतरचा कार्यभाग हा सहज आणि सोप्यापद्धतीने पुढे नेता येऊ शकेल. एयु एसएफ़बी चे सध्याचे एक्झिकिटीव संचालक असलेले उत्तम टिबरवाल यांना एयु एसएफ़बी चे एक्झिकिटीव संचालक तर असतीलच तसेच त्यांना डेप्युटी सीईओ म्हणून बढती दिली जाईल.
