एअर इंडियाच्या मुंबई-अमेरिका यातील सर्व मार्गांवर नव्याने दाखल झालेल्या बोईंग ७७७ विमानांमुळे मिळणार प्रवासाचा सुखद अनुभव
गुरुग्राम: एअर इंडिया ही भारताची जागतिक पातळीवरील आघाडीची विमान वाहतूक कंपनी अ,ून, कंपनीने मुंबईतून अमेरिकेत न्यूयॉर्क जेएफके एअरपोर्ट, नेवार्क लिबर्टी एअरपोर्ट (न्यू जर्सी) आणि सॅन फ्रान्सिस्को या सर्व तीनही ठिकाणी जाणाऱ्या विमानफेऱ्यासाठी बी७७७ विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच उत्तर अमेरिकेसाठी मुंबईतून जाणाऱ्या एअर इंडियाच्या सर्व फेऱ्यांसाठी अत्याधुनिक विमान वापरण्यात येणार आहे. त्यातील सर्व क्लाससाठीच्या सीट, मनोरंजनाच्या सर्व सुधिधा अत्याधुनिक आहेत.
तसेच, मुुंबई आणि लंडन हिथरो दरम्यान चालणाऱ्या एअर इंडियाच्या रोजच्या दोन फेऱ्यांसाठी (AI130/AI131) नवीन बी७७७ हे अत्याधुनिक विमान वापरण्यात येणार आहे. त्यातील इंटेरिअर मॉडर्न आहेच शिवाय त्यात फर्स्ट क्लास केबिनचीही सुविधा आहे.
सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क-जेएफके येथे जाणाऱ्या बी७७७-२०० एलआर या विमानांमध्ये २८ बिझनेस, ४८ प्रिमियम इकॉनॉमी आणि २१२ इकॉनॉमी क्लास सीट्स आहेत. याशिवाय बी७७७-३००ईआर हे विमान न्यूवार्क-लिबर्टी आणि लंडनला जाणार असून त्यात ८ फर्स्ट क्लास, ४० बिझनेस आणि २८० इकॉनॉमी क्लास सीट्स आहेत.
एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ कॅम्बेल विल्सन म्हणाले की, मुंबईतून अमेरिकेत जाणाऱ्या सर्व आणि लंडन साठीच्या आमच्या एका विमान फेऱ्यांसाठी अत्यंत चांगला अनुभव मिळवून देण्यात येत असल्याचा आम्हाला आनंद आहे. प्रवाशासाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. एअर इंडियातील सेवामध्ये परिवर्तन करण्याच्या आमच्या उपक्रमाचा हा एक भाग असून सात नवीन बी७७७ विमाने गेल्या वर्षभरात दाखल करण्यात आली आहेत. आता चार आणखी करण्यात येत आहेत. याशिवाय येत्या काही महिन्यांत ६ नवीन एअरबस ए३५०एस विमानेही येत आहेत. या सर्व विमानांमध्ये उच्च दर्जाचे इंटेरिअर असून २०२४ पर्यंत सर्व प्रकारच्या फेऱ्यांसाठी इंटेरिअर अपग्रेड करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत.
या नव्या फ्लाइट्ससाठी बुकिंग करण्यासाठीची सुविधा एअर इंडियाच्या वेबसाइटसह (www.airindia.com) मोबाईल अॅप, ट्रॅव्हल एजंट्स (ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्ससह) सर्व प्रकारच्या चॅनेलवर उपलब्ध आहे.
