महाराष्ट्रातील ‘या’ गावात झाले रावण पूजन; रावण दहन बंद करण्याची केली मागणी
परभणी : जिल्ह्यातील झरी (बिरसा मुंडा नगर) येथे पृथ्वी चे आदिवासी महाराजा.. महाविद्वान..महाज्ञानी..शिव तांडव चे रचेता..भगवान शिव चे प्रथम भक्त..श्रीमंतयोगी महात्मा राजा रावण यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या विषयी अधिक माहिती देताना मानव मुक्ती मिशनचे परभणी तालुका अध्यक्ष -संतोष धोत्रे यांनी सांगितले की, समृध्द संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे. महान दर्शनिक, संगीत तज्ञ, राजनितीज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट नगररचनाकार, समताधिष्टित समाज व्यवस्थेचा उद्गाता साहित्यीक, न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा अविष्कार करणारा महात्मा राजा होता. अशा महान राजाला इथल्या षडयन्त्रकारी, वणीघ व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसुर ठेवली नाही. खलनायक म्हणून प्रसिध्द केले आहे. परंतु सत्य लपून राहत नाही ते कधी ना कधी उघड होतेचं असे धोत्रे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आदिवासी समाजातील व इतर ही समाजातील संशोधक, साहित्यीक यांनी महत्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधुन काढला व जगासमोर मांडला आहे. वास्तविक राजा रावण सारखा महापराक्रमी योध्दा झाला नाही. यापुढे होणारही नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिर आहेत. सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशातील मंदसौर येथे अंदाजे १५ मी. उचीची आहे. छत्तीसगड मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावतीतील जिल्हयात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पूजा केली जाते. परंतु आदिवासीच्या या समाताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उदगाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणुन रावण दहण करण्याची परवानगी कोणालाही देऊ नये ही प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी संतोष धोत्रे यांनी केली आहे.
यावेळी भगवान कोकाटे, माऊली साबळे, ज्ञानेश्वर कोकाटे,निवृत्ती बोडखे,राजु धोत्रे, अमोल धोत्रे,बाळू कोकाटे,मारोती कोकाटे, पांडुरंग तनपुरे,बबन धोत्रे,विष्णु कोकाटे, प्रसाद कोकाटे,रावजी जामकर,आंबादास (पंडे )सावंत, पाराजी नन्नवरे,इरफान कुरेशी व आदिवासी महिला देखील उपस्थित होत्या.
