Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘छाया नाट्या’चे आयोजन

 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल, भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि कल्याण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२१ ऑक्टोबर) ‘कर्नाटकातील छाया नाट्य’ या विषयावर सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. प्रकाश गरुड कर्नाटक प्रांतातील छाया-बाहुली नाटक प्रकाराची महिती देणारे हे व्याख्यान देणार आहे. तसेच या प्रसंगी पपेट हाऊस धारवाड या संस्थेद्वारे सादर केल जाणाऱ्या ‘अद्भूत रामाय0ण’ या नाटकातील काही प्रसंगाचे सादरीकरणही डॉ. प्रकाश गरुड व त्यांचे सहकारी करणार आहेत. विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात सकाळी ११.३० वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ललित कला केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading