Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

संगणकीय कौशल्य युवा पिढीने अद्ययावत ठेवावी – सुरज लकाल

पुणे : संगणकीय कौशल्य प्रशिक्षण युवा पिढीसाठी आवश्यक असून युवकांनी सातत्याने आपापली संगणकीय कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे,असे मत एम.के.सी.एल चे समन्वयक सूरज लकाल यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी पुण्यात यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर मध्ये आयोजित प्रशस्तीपत्र वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घ्यावा,चॅट जीपीटी, ए.आय. सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे नेमके काय बदल घडले आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे, असेही सुरज लकाल यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या हस्ते एमएससी आय टी, टॅली आणि ब्युटी पार्लर कोर्सच्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी हिना खान व आयेशा पटेल यांनी प्रशिक्षिकेची जबाबदारी सांभाळली.यावेळी प्रगती बोराडे, सायली मोरे व पायल ढगे या विद्यार्थिनींनीही आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, एम.के.सी.एल च्या मार्केटिंग विभागाचे अधिकारी सोमनाथ अंबुलगे यांच्यासह संस्थेचा प्रशिक्षक वर्ग, अन्य कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख प्राची राऊत यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading