Saturday, June 20, 2026
Latest NewsSports

साऊथ आफ्रिकेत ५ व्या विश्वचषक टेनिकॉईट स्पर्धेत (रिंग टेनिस) सुवर्ण व कांस्य पदक मिळवून देशात उंचावले महाराष्ट्राचे नाव

पुणे : ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान साऊथ आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात झालेल्या टेनिकॉईट (रिंग टेनिस) विश्वचषक स्पर्धेत सहभागी असलेल्या भारतीय संघात महाराष्ट्राचे खेळाडू प्रथमेश ढवळे, संजय चेटुले,व सिद्धी जाधव सिनियर संघात व नंदिनी फेंडर हिच्या ज्युनिअर संघात समावेश होता.

या जागतिक स्पर्धेत ज्युनिअर गटातील (२३वर्षाखालील) भारतीय संघाने सांघिक विभागात जर्मनी सारख्या बलाढ्य संघाला नमवून विश्व विजेते पदाचे सुवर्ण पदकावर कब्जा केला.तसेच सिनियर भारतीय संघाने तृतीय क्रमांकाचे ब्रॉंझ मेडल मिळवले .या चारही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा सन्मानात मानाचा तुरा रोवला गेला.प्रथमेश, सिद्धी, नंदिनी व संजय यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आईवडील व त्यांचे प्रशिक्षक यांना दिले.तसेच गौरवाची बाब म्हणजे या स्पर्धेत पुण्याचे अनिल वरपे यांची पंच म्हणून निवड झाली होती.त्यांनाही उत्कृष्ट पंच म्हणून सन्मानित करण्यात आले.प्रथमेश, सिद्धी, नंदिनी व संजय यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अध्यक्ष मा. आ. मोहनदादा जोशी, कार्याध्यक्ष डॉ. विजय दर्डा,सचिव अनिल वरपे, प्रथमेश आबनावे, जिल्हा क्रीडा आधिकारी महादेव कसगावडे तसेच भंडारा जिल्हा टेनिकॉईक (रिंग टेनिस) असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मधुकांत बांडेबुचे, श्रीमती माधुरी गानू, यशवंत वेदपाठक, चंद्रकांत पिंपळे, बाळासाहेब जगताप,चेतन आगरवाल, तसेच महाराष्ट्र टेनिकॉईट (रिंग टेनिस) संघटनेचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रीय खेळाडू यांनी अभिनंदन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading