‘अॅमेझॉन’ने विक्रेत्यांसाठी सादर केली बक्षिसे जिंकण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी संधी
- अॅमेझॉन विक्रेते बक्षिस योजनेच्या माध्यमातून या सणासुदीच्या हंगामात बक्षिसे जिंकण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी संधी सादर, विक्रेत्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या* बक्षिसांव्यतिरिक्त लक्झरी कार (मर्सिडीज-बेंझ) जिंकण्याचीही संधी
- योजनेचा भाग म्हणून, २० विक्रेत्यांना युरोप किंवा थायलंडसारख्या आंतरराष्ट्रीय सहलीसाठी जाण्याचीदेखील संधी.
- ‘अॅमेझॉन’ने ‘द ग्रेट इंडियन रेफरल ऑफर’देखील केली सादर. आपल्या मित्रांना ‘अॅमेझॉन डॉट इन’वर विक्री करण्यास उद्युक्त करून बक्षिसे मिळविण्याची विद्यमान विक्रेत्यांना संधी. विक्रेते आता त्यांच्या मित्रांना ‘अॅमेझॉन डॉट इन’वर आमंत्रित करू शकतात आणि ११,५०० रुपयांपर्यंतची* बक्षिसे मिळवू शकतात.
बंगळुरू: देशभरातील विक्रेत्यांसाठी हा सणाचा हंगाम यशस्वी करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून, ‘अॅमेझॉन’ने ‘अॅमेझॉन विक्रेते बक्षिस २०२३’ ही बक्षिसे जिंकण्याची योजना सादर केली आहे. विक्रेत्यांना आता १० लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांव्यतिरिक्त लक्झरी कार [मर्सिडीज-बेंझ] जिंकण्याचीदेखील संधी मिळू शकेल. यासाठी, विक्रेत्यांनी १० नोव्हेंबर २०२३पर्यंत ‘अॅमेझॉन विक्रेते बक्षिस २०२३’ योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. त्याशिवाय, २० विक्रेत्यांना युरोप किंवा थायलंडला आंतरराष्ट्रीय सहलीला जाण्याची संधीदेखील मिळू शकेल. या योजनेमध्ये सहभागी होऊन आणि योजनेच्या अटी व शर्तींनुसार निकष पूर्ण करून विक्रेते ही बक्षिसे जिंकू शकतात.
‘अॅमेझॉन’ने आपल्या सर्व विक्रेत्यांसाठी २८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘द ग्रेट इंडियन रेफरल ऑफर’ सादर केली आहे. या योजनेंतर्गत, विक्रेते आता त्यांच्या मित्रांना अॅमेझॉन डॉट इनवर नोंदणी आणि विक्री करण्यासाठी संदर्भ देऊ शकतात आणि ११,५०० रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळवू शकतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी विक्रेत्यांनी ‘अॅमेझॉन सेलर सेंट्रल’ या वेबसाइटवरील ‘पार्टिसिपेट नाऊ’ या बटणावर क्लिक करून नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर विक्रेते त्यांच्या आमंत्रणाची लिंक त्यांच्या मित्रांना, सहकाऱ्यांना किंवा व्यवसायातील ओळखीच्या व्यक्तींना शेअर करू शकतात, ज्यांना ‘अॅमेझॉन डॉट इन’मध्ये विक्रेता म्हणून सामील होण्यास स्वारस्य आहे.
‘अॅमेझॉन इंडिया’मधील ‘सेलिंग पार्टनर सर्व्हिसेस’चे संचालक अमित नंदा म्हणाले, “आमच्या विक्रेत्यांसाठी सर्वकालीन सर्वोच्च बक्षिसे जिंकण्याची संधी सादर करताना आम्ही उत्साही आहोत. आमचा विश्वास आहे की विक्रेते हे आमच्या व्यवसायाचा कणा आहेत आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने व संसाधने पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. या आमच्या विक्रेत्यांची परतफेड करण्याचा ही योजना हा आमचा मार्ग आहे. वर्षातील सर्वात व्यग्र अशा कालखंडाची तयारी ते करीत असताना आम्ही त्यांना सहाय्य करीत आहोत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या अनेक बक्षिसांचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्व विक्रेत्यांना प्रोत्साहित करतो.”
‘अॅमेझॉन’ने २७ ऑगस्ट ते ४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान सामील झालेल्या सर्व नवीन विक्रेत्यांसाठी ५० टक्के रेफरल फी माफीची घोषणा केली आहे. ही माफी ६० दिवसांसाठी वैध आहे. विक्रेत्यांचे खर्च कमी करण्यासाठी आणि नवीन विक्रेत्यांना समर्थन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्थानिक व्यवसाय आणि एमएसएमई यांच्यासाठी आगामी सणासुदीचा हंगाम हा ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याची किंवा वाढवण्याची उत्तम संधी आहे. नील्सन मीडियासह अलीकडील सहयोगी संस्थांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की भारतातील ८१ टक्के ग्राहक सणासुदीच्या काळात खरेदीचे नियोजन करीत असतात. विविध व्यावसायिक आणि एमएसएमई यांना या काळात मोठ्या संधी मिळू शकतात. ‘अॅमेझॉन डॉट इन’ला ६८ टक्के ग्राहकांनी आपल्या पसंतीचे ‘ऑनलाइन शॉपिंग डेस्टिनेशन’ म्हणून ओळखले आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणून त्यांनी ‘अॅमेझॉन’ची निवड केलेली आहे.
‘अॅमेझॉन’ने आगामी सणाच्या हंगामाच्या तयारीसाठी विक्रेत्यांना ऑनलाइन विक्री सुव्यवस्थित करण्यात मदतीसाठी अनेक नवकल्पनादेखील आणल्या आहेत. भारतीय विक्रेत्यांसाठी सुरळीत स्वरुपाची नोंदणी प्रक्रिया कंपनीने राबविली आहे. यातून नव्या विक्रेत्यांना ऑनलाइन विक्री सुरू करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांना आकर्षक डील ऑफर करण्यात, इन्व्हेंटरी सुरळीत राखण्यात आणि संभाव्य विक्री वाढविण्यात ‘सेल इव्हेंट प्लॅनर’ या योजनेतून मदत होते. याव्यतिरिक्त, नवीन ‘सेलर सक्सेस सेंटर’द्वारे नवीन विक्रेत्यांसाठी थेट प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. प्रथमच विक्री व्यवसायात उतरलेल्यांना यातून मोलाची मदत मिळते. नवीन विक्रेत्यांना त्यांच्या सर्व शंका दूर करण्यास, तसेच मालाची सूची तयार करणे, शिपिंग, प्राइम, डील कूपन योजना, मार्केटप्लेसवर विक्री करणे इत्यादे अनेक गोष्टी समजून घेण्यास या विनामूल्य वेबिनारच्या माध्यमातून सहाय्य होते.
