Maratha Reservation : मराठ्यांना भडकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भुजबळांना सुपारी – मनोज जरांगे पाटील
अंतरवाली सराटी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे विराट सभा झाली. यावरून ॅड गुणारत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादीचे छगन भूजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत टीका केली आहे. मराठ्यांना भडकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सदावर्ते आणि भूजबळ यांना सुपारी देण्यात आली असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र माराठ्यांवर टीका केल्यावर मराठा समाज भडकेल अन् यामध्ये काही वाद निर्माण होईल, अशा उद्देशाने ॅड गुणारत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादीचे छगन भूजबळ मराठा समाजाच्या लढयावर टीका करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी सांगितले आहे. अशी मला माहिती मिळाली आहे, असा थेट आरोप जरांगे यांनी यावेळी केली.
भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका
या सभेसाठी 7 कोटी खर्च आला असल्याची टीका छगन भूजबळ यांनी काल केली होती. या टीकेचा जरांगे यांनी जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला. जरांगे म्हणाले, “100 एकर आम्ही विकत नाही घेतली. भाड्याने घेतली आहे. लोक स्वतःहून पैसे देतात. पण ज्यांनी टीका केली त्याला ज्या मराठ्यांनी ला मोठं केलं त्यानेच जनतेचे पैसे खाल्ले. अजित पवारांनी यांचा समाचार घ्यावा, माझ्या नादी लागलात तर मी सोडत नसतो.”
