सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी स्वराज काळभोरचे अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दमदार यश
पुणे : कोल्हापूर येथील कुरुंदवाड येथे नुकत्याच जिल्हा क्रीडा परिषद यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीक रोमन प्रकारात पुणे विभागातील किवळे येथील सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पैलवान स्वराज काळभोर यांनी कांस्यपद पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. स्वराज काळभोर हा सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११वी विज्ञान शाखेमध्ये मध्ये शिकत आहे.
स्वराजच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनी देखील स्वराजचे त्याच्या यश बद्दल कौतुक केले. प्राचार्या भावना नरसिंगोजु , क्रीडा शिक्षक दर्शन गंधे व इतर कर्मचारी यांनी स्वराजचे या यशासाठी अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रोत्साहित करत असते.
