Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यातील PSI ने ऑनलाइन जुगरात जिंकले दीड कोटी

पिंपरी : वेगवेगळया प्रकारच्या ऑनलाइन जुगाराणे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे समोर येत असतात.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह्यखात्यातील कारभाराविषयी फारसे न बोलणे चांगले अशी परिस्थिती आहे.  पिंपरी – चिंचवड पोलिस मुख्यालयात ऑन ड्यूटी असलेल्या एका पोलिस उपनिक्षकाने  ऑनलाइन जुगरात दीड कोटी रुपये जिंकले आहेत, हा पोलिस उपनिरीक्षक कार्यालयात बसून  ‘ड्यूटी’ करतो की ऑनलाइन गेमिंग मध्येच ‘बिझी’ असतो असा प्रश्न सामान्य नागरिकांना यानिमित्ताने पडला आहे.

सोमनाथ झेंडे असे या पोलिस उपरीक्षकांचे नाव असून त्यांना  ड्रीम 11 या ऑनलाइन जुगार अॅपवर  दीड कोटींचं बक्षीस लागलं आहे. त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकाचे नशीब पालटल आहे. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड  या क्रिकेट सामन्यावर त्यांनी हा जुगार जिंकला आहे.

सध्या सुरु असलेला विश्वचषक आपण नियमितपणे पाहत असून क्रिकेटची आवड असल्याचे सोमनाथ झेंडे यांनी सांगितले. दीड कोटींचे बक्षीस लागल्यानंतर सोमनाथ झेंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून ड्रीम 11 यावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यावर टीम लावली होती. त्यात दीड कोटींचे बक्षीस मिळाले आहे, असे झेंडे यांनी सांगितले. सुरुवातीला माझा यावर विश्वासच बसला नाही. पण, नंतर याचे दोन-दोन लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे खरे असल्याची खात्री पटली असेही सोमनाथ झेंडे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading