Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

स्टार हेल्थ इन्शुरन्स कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय सरोगसी आणि ओसाइट डोनर यासाठी विमा संरक्षण सादर करत आहे

पुणे  : भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड  इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या लोकप्रिय महिला केंद्रित विमा योजना ‘स्टार वुमेन केअर इन्शुरन्स पॉलिसी’ मध्ये सरोगसी कव्हर आणि ओसाइट डोनर कव्हर सादर केले आहे. सहाय्यक गर्भधारणा उपचारांतर्गत वाढत्या गरजा पूर्ण करणारे हे एक महत्त्वपूर्ण विमा संरक्षण आहे. त्यामुळे सरोगेट माता आणि ओसाइट दात्यांना आरोग्य विमा संरक्षण मिळते आणि ईच्छुक पालक जोडप्यांना मन:शांती मिळते. स्टार हेल्थने पॉलिसीधारकांकडून कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय या विमा संरक्षणाचा  समावेश केला आहे.

पॉलिसी सरोगसी विमा संरक्षणा अंतर्गत सरोगेट मातेकडून झालेल्या प्रसूतीनंतरच्या ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी वैद्यकीय गुंतागुंतीकरता रूग्णालयात भरती केल्यावरच्या खर्चासाठी विमा संरक्षण सादर करते. याशिवाय, स्टार हेल्थ इन्शुरन्स आता ओसाइट डोनर कव्हरेजही पुरवतो. पॉलिसी आता ओसाइट डोनर साठी १२ महिन्यांच्या कालावधीकरता सहाय्यक पुनरुत्पादक उपचार प्रक्रियेमुळे उद्भवणार्‍या गुंतागुंतांसाठी रूग्णालयात भरती केल्यावर होणाऱ्या खर्चाचे संरक्षण पुरवेल.

सरोगसी विमा संरक्षण उपचार किंवा प्रक्रिया सुरू केल्याच्या तारखेपासून सुरू होईल. “अपघातामुळे गर्भपात” अशी काही दुर्दैवी घटना घडल्यास स्टार हेल्थ पॉलिसीच्या अटींनुसार सरोगेट आईला एकरकमी रक्कम देईल.

पॉलिसीत घालण्यात आलेली भर याबाबत बोलताना स्टार हेल्थ अँड अलाइड  इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “आमच्या स्टार वुमेन केअर विमा पॉलिसीमध्ये सरोगसी कव्हर आणि ओसाइट डोनर कव्हरचा समावेश झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. महिलांचे आरोग्य आणि स्वास्थ्य यासाठी असलेली आमची बांधिलकी यातून अधोरेखित होते. ही नव्याने घालण्यात आलेली भर आमच्या ग्राहकांच्या सतत बदलत्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी आमची धोरणे सतत वाढवण्याचे आमचे समर्पण प्रतिबिंबित करते. ही विमा योजना महिलांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आली असून वाढत्या वैद्यकीय खर्चाबद्दलच्या त्यांच्या चिंता कमी करत त्यांना आश्वस्त करते.”

 

पॉलिसीमध्ये विमा संरक्षण मिळण्यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे. जसे की इच्छुक जोडपे, सरोगेट माता आणि उपचार घेणाऱ्या हॉस्पिटलने सरोगसी कायदा आणि एआरटी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. तसेच, राष्ट्रीय एआरटी आणि सरोगसी रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत मान्यताप्राप्त केंद्रांवर सरोगसी आणि ओसाइट डोनेशन केले गेले पाहिजे.

 

“हा विकास आणि नावीन्यपूर्णतेसाठी आमच्या असलेल्या बांधिलकीमुळे आम्ही महिलांना त्यांच्या आरोग्य विम्याच्या गरजा नियंत्रित करण्यास सक्षम बनवतो, आणि त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची खातरजमा करतो,” असेही रॉय पुढे म्हणाले.

 

स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही पूर्ववैद्यकीय चाचण्या घेण्याची गरज नाही. पॉलिसी अनेक विशेष वैशिष्ट्यांसह येते जसे की पूर्व-स्वीकृती वैद्यकीय तपासणी, मध्यावधी समावेश, गर्भधारणेदरम्यान पॉलिसी खरेदी करण्याची सुविधा, गर्भधारणा काळजी उपचार, यूटेरॉ फेटल शस्त्रक्रिया, नवजात बाळाचा हॉस्पिटलायझेशन खर्च, लसीकरण, बालरोगतज्ञ/वैद्यकीय सल्ला, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि बरेच काही यात समाविष्ट आहे.

या पॉलिसीद्वारे माता त्यांच्या नवजात बालक/मुलांसाठी आरोग्य कवचही देऊ शकतात. पॉलिसी अंतर्गत, नवजात मुलाला पहिल्या दिवसापासून विम्याच्या रकमेच्या २५% पर्यंत आणि पुढील वर्षापासून विम्याच्या रकमेच्या १००% पर्यंत आरोग्य कवच मिळेल. पॉलिसीचे स्टार मदर कव्हर वैशिष्ट्य यात  विमाधारक मुलाचे वय १२ वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये भरती असल्यास विमाधारक आईच्या हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे देखील विमा संरक्षणात येते.

स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • सरोगेट मदर विमा संरक्षण: २५ ते ३५ वर्षे वयोगटातील प्रौढांसाठी विमा संरक्षण (प्रस्तावक इच्छुक जोडपे यापैकी एक असावा)
  • ओसाइट डोनर विमा संरक्षण: २५ ते ३५ वर्षे वयोगटातील प्रौढांसाठी विमा संरक्षण (प्रस्तावक इच्छुक जोडप्यांपैकी एक असणे आवश्यक आहे)

 विम्याची रक्कम एक कोटी रु. पर्यंत उपलब्ध आहे;

  • पॉलिसीचा प्रकार – केवळ १८ ते ७५ वर्षे वयोगटातील महिलांसाठी वैयक्तिक विम्याची रक्कम
  • फ्लोटर विम्याची रक्कम- कुटुंबात जोडीदार आणि अवलंबित मुलांसह किमान एक महिला असलेले १८ ते ७५ वर्षे प्रौढ
  • विमा संरक्षण – रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा खर्च, प्रसूती, डे केअर उपचार, रुग्णवाहिका, हवाई रुग्णवाहिका, अवयवदात्याचा खर्च आणि रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च
  • अतिरिक्त लाभांमध्ये आयुष उपचार, पुनर्वसन आणि वेदना व्यवस्थापन, प्रसवपूर्व काळजी (गर्भधारणा काळजी), यूटेरो फेटल शस्त्रक्रिया/उपचार, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, पर्यायी संरक्षण (कर्करोगाच्या निदानावर एकरकमी), आधुनिक उपचारांसाठी विमा संरक्षण, वैद्यकीय आणि दूरध्वनीवरुन आरोग्य सल्लामसलत यांचा समावेश होतो.
  • पहिल्या दिवसापासून बाह्यरुग्ण वैद्यकीय खर्च कव्हर करते
  • एकूण विमा रकमेच्या आंशिक किंवा पूर्ण वापरानंतर १००% एकदा मूळ विमा रक्कम स्वयंचलितपणे पुनर्संचयित करणे

पॉलिसीच्या फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी आरोग्य तपासणी लाभ
  • नवजात बाळाच्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणारा खर्च
  • मूळ विम्याच्या रकमेच्या जास्तीत जास्त १००% पर्यंत प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी संपणाऱ्या विम्याच्या रकमेच्या २०% संचयी बोनस
  • स्टार मदर विमा संरक्षण विमा उतरवलेल्या आईच्या खोलीचे भाडे (त्याच रुग्णालयात आपल्या पाल्यासोबत राहण्यासाठी) विमा सुरक्षित करते, विमा उतरवलेल्या मुलाचे वय १२ वर्षांपेक्षा कमी आहे आणि रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल आहे
  • सहाय्यक गर्भधारणा उपचारांमध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत आयव्हीएफ सारख्या विशेष गर्भधारणा उपचारांचा समावेश होतो
  • पुनर्वसन आणि वेदना व्यवस्थापन खर्च विमा रकमेच्या १०% पर्यंत किंवा उप-मर्यादा पर्यंत कव्हर करतो
  • विशिष्ट मर्यादेपर्यंत २ डिलिव्हरी पर्यंत सी-सेक्शनसह प्रसूती खर्चाचा समावेश
  • नवजात बाळासाठी हॉस्पिटलायझेशन खर्चामध्ये वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपचार, १२  महिन्यांपर्यंत लसीकरण, चयापचय तपासणी आणि बालरोगतज्ञांचा सल्ला (४ सल्लासेवा) यांचा समावेश होतो.
  • स्टार वेलनेस प्रोग्राम विविध स्वास्थ्य उपक्रमांद्वारे विमाधारकांना प्रोत्साहन आणि बक्षीस देतो. विमाधारक व्यक्ती प्रीमियममध्ये सूट मिळवण्यासाठी वेलनेस रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकते

 

स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसी १८ वर्षे ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व महिलांसाठी वैयक्तिक पॉलिसी आणि फ्लोटर पॉलिसी या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading