नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेबरोबर भारतीय लोककलांचा देखील विचार करू – डाॅ. पराग काळकर
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्यावतीने शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार २०२३ चे आयोजन डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात करण्यात आले होते. बुलढाण्याचे युवाशाहीर विक्रांतसिंह राजपूत यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी युवा उद्योजक शंकर बारवे, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते. मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहिरी लोककला पुढील पिढीला देण्यासाठी, ती टिकवून ठेवण्यासाठी प्रबोधिनी नेहमीच तत्पर असते. हे कार्य असेच पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रबोधिनीचे स्वतःचे गुरूकुल असावे असे स्वप्न आहे. आज ते स्वप्न साकार होत आहे. या गुरूकुलतून शाहीरी लोककलेची सर्व माहिती आणि शिक्षण देण्याचे काम आम्ही करणार आहोत. परंतु त्यासाठी लागणारा निधी मोठा आहे, त्यासाठी प्रबोधिनी प्रयत्न करीत असल्याचे ही त्यांनी सांगितले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले, अरुणकुमार बाभुळगावकर यांनी आभार मानले.
