Wednesday, September 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. जयंत पाटलांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तसंच ठाकरे गटाच्या याचिकेवरही शुक्रवारी सुनावणी पार पडेल. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी होणा-या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ठाकरे गटाच्या याचिकेवर १३  ऑक्टोबरला म्हणजेच येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर ११ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. अ‍ॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीवर भाष्य केले.

शिवसेना आणि राष्टवादी या याचिकांवर एकत्र यावर सुनावणी होईल. १३ ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे. ती सुनावणी आधी पुढच्या महिन्यात गेली होती. पण ती सुनावणी आधीच होईल. आता सुनील प्रभू आणि जयंत पाटील या दोन्ही याचिकेवर एकत्र सुनावणी होईल. या दिवशी सर्वोच्च न्यायालय काहीतरी निर्देश १३ तारखेला देऊ शकते. ठाकरे गटाच्या याचिकेवर तीन नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र ती १३ ऑक्टोबरला होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading