डीमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी शेअरखानने केली NeSL सोबत भागीदारी
मुंबई : भारतातील सर्वात विश्वासार्ह पूर्ण-सेवा देणारे ऑनलाइन ब्रोकरेज हाऊस शेअरखानने बॅकएंडवर डीमॅट खाते उघडण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटलीकरण करण्यासाठी नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NeSL) सोबत सहकार्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी ब्रोकरेज उद्योगातील एक महत्त्वाची कामगिरी दर्शवते. यामुळे शेअरखानला डिजिटल परिवर्तन सादर करणारे भारतातील पहिले आणि एकमेव ब्रोकर म्हणून स्थान मिळाले आहे. त्यामुळे ऑनबोर्डिंगचा वेळ कमी करून लाखो नवीन ग्राहकांना फायदा होईल.
भरपूर कागदपत्र करावे लागणाऱ्या डीमॅट डेबिट आणि प्लेज इंस्ट्रक्शन (DDPI) वर प्रत्यक्ष स्वाक्षरी आणि मुद्रांकित (फ्रँक केलेले) असणे आवश्यक अशा डीमॅट खाते उघडण्याच्या नियमित पद्धतींच्या उलट शेअरखानचा हा अग्रगण्य आधुनिक दृष्टिकोन प्रत्यक्ष स्टॅम्प पेपर खरेदी आणि स्वाक्षरीची गरज दूर करतो.
आत्तापर्यंत, ग्राहक एकतर DDPI दस्तऐवजावर प्रत्यक्ष स्वाक्षरी करत होते. त्यासाठी ब्रोकर स्टॅम्प पेपरची व्यवस्था करतात आणि ते जोडतात किंवा अंशतः डिजिटल प्रक्रियेची निवड करतात. त्यामध्ये ग्राहक DDPI दस्तऐवजाच्या स्कॅन केलेल्या प्रतीवर डिजिटल स्वाक्षरी करतात, तर ब्रोकर स्टॅम्प पेपरची खरेदी आणि प्रिंट-आउट्सची साठवण करण्याचे काम करत राहतात. NeSL ऑन बोर्ड आल्यामुळे बॅकएंड प्रक्रिया डिजीटल झाली आहे आणि जेथे DDPI माहिती साठवली जाईल अशी रिपॉझिटरी म्हणून देखील कार्य करेल.
शेअरखानचा डिजिटल उपक्रम पर्यावरणीय शाश्वतता उद्दिष्टांशी सुसंगत असून भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया‘ कार्यक्रमाशी सुसंगत आहे.
बीएनपी परिबासद्वारे शेअरखानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयदीप अरोरा म्हणाले: “आम्ही आमच्या ग्राहकांना एक अतुलनीय अनुभव निर्माण करण्याचा मार्ग दाखविण्यासाठी खूप उत्सुक आहोत. प्रत्यक्षातील कागदपत्रे आणि स्टॅम्प पेपर खरेदीची गरज दूर करून, शेअरखानची पेपरलेस डीमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया केवळ सोय वाढवत नाही तर पर्यावरणीय शाश्वततेमध्ये लक्षणीय योगदान देते. हे नाविन्यपूर्ण पाऊल ग्राहक-केंद्रित, पर्यावरणास अनुकूल सुविधा पुरविण्याच्या आमच्या ध्येयाशी अखंडपणे सुसंगत आहे. ते आमच्या ग्राहकांसाठी प्रवास सुलभ करते, सहज करते आणि आमचे कार्बन फूटप्रिंट देखील कमी करते. आमचा विश्वास आहे की ग्राहक-केंद्रितता आणि शाश्वतता एकत्र करून आम्ही भारतातील वित्तीय सेवांचे भविष्य घडवत आहोत.”
शेअरखानचा अभिनव डिजिटलायझेशन उपक्रम या संपूर्ण प्रक्रियेत क्रांती घडवून आणत आहे. अखंड, डिजिटल अनुभवाने गुंतागुंतीच्या कागदपत्रांची जागा घेतली आहे. दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यापासून ते मुद्रांकन (फ्रँकिंग) पर्यंत, प्रत्येक पायरी आता डिजिटल माध्यमांद्वारे कुशलतेने हाताळली जाते. या परिवर्तनामुळे शेअरखानच्या मूल्यवान ग्राहकांना अनेक लाभ मिळत आहेत. गुंतवणूकदार आता कागदपत्रांचा त्रास पूर्णपणे टाळून कमी वेळेत सहजतेने डीमॅट खाती उघडू शकतात.
NESL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबज्योती रे चौधरी म्हणाले, “NeSL चे DDE (डिजिटल डॉक्युमेंट एक्झिक्यूशन) २४/७ उपलब्ध आहे आणि कोणीही आपल्या घरातून किंवा ऑफिसमधून आरामात ही कागदपत्रे प्लॅटफॉर्मवर कार्यान्वित करू शकतात. हे पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस आहे, वास्तविक राज्य सरकारांसह API द्वारे डिजिटल ई-स्टॅम्प प्रमाणपत्र आणि डिजिटल स्वाक्षरीद्वारे कागदपत्रांची अंमलबजावणी त्या त्या वेळेला होते. डिजिटल स्वाक्षरी आधार आधारित ई-साइन ओटीपीद्वारे किंवा बायोमेट्रिक मोड किंवा डोंगल-आधारित डीएससीद्वारे केली जाऊ शकते. NeSL च्या DDE ने पूर्ण-डिजिटल क्रेडिट प्रक्रिया सुलभ करून आरबीआय नियंत्रित संस्थांद्वारे सादर केलेल्या बँक कर्जासाठी कागदपत्रांचा मार्ग आधीच बदलला आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की आता प्रथमच सेबी नियंत्रित संस्थेद्वारे कागदपत्रे कार्यान्वित करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही शेअरखान लिमिटेडचे अभिनंदन करून आभार मानतो.”
eMudhra चे भारत आणि APAC प्रमुख बिजू वर्गीस म्हणाले, “eMudhra ने NeSL डिजिटल डॉक्युमेंट एक्झिक्यूशन सर्व्हिसेस सोबत आमच्या अत्याधुनिक emSigner सुविधेच्या जोडीने कार्यात्मक करारांमध्ये परिवर्तन करण्याच्या दिशेने हे अग्रगण्य पाऊल उचलण्यासाठी शेअरखान बरोबर सहयोग केल्याचा अभिमान वाटतो. या धोरणात्मक भागीदारीसह आम्ही डिजिटल दस्तऐवजांच्या eSigning चा वापर करून कार्यक्षमतेच्या आणि पारदर्शकतेच्या नवीन युगाची सुरुवात करत आहोत. यातून आमच्या समृद्ध कौशल्याचा लाभ घेऊन, जटिल प्रक्रिया सुलभ करत आणि सुरक्षित, अखंड विनाअडथळा करार अंमलबजावणी सुनिश्चित करून नावीन्यपूर्ण आणि आमच्या ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्याची आमची बांधिलकीही दिसून येते. एकत्रितपणे आम्ही आर्थिक उद्योगात अधिक चपळ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम भविष्यासाठी मार्ग मोकळा करत आहोत.
बीएनपी परिबासचे शेअरखान, २००० मध्ये स्थापन झाल्यापासून भारतीय स्टॉक ब्रोकिंग उद्योगात एक ट्रेलब्लेझर आहे. कंपनी संपूर्ण भारतातील लाखो ग्राहकांना व्यापार आणि गुंतवणूक सुविधांसह सर्वसमावेशक वित्तीय सेवा पुरविण्यासाठी समर्पित आहे. शेअरखानचा NeSL सोबतचा सहयोग भारतातील वित्तीय सेवांच्या डिजिटायझेशनमध्ये महत्त्वपूर्ण झेप दर्शवते. शाश्वतता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी शेअरखानच्या वचनबद्धतेला बळकटी देत हा उपक्रम डीमॅट खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करतो.
